फलटण :-फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक २ चे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सनी ( भैय्या ) अहिवळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला . आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की , फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार कामकाज करीत आहे . येणाऱ्या काळामध्ये सनी अहिवळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २ चे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत .
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी यावेळी सांगितले की , संपूर्ण फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कामकाज करीत आहोत . फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत . सनी ( भैय्या ) यांच्या रूपाने राष्ट्रवादीला शहरात एक खंबीर ,युवा नेतृत्व मिळाले आहे . त्यांचा यथोचित सन्मान ठेवण्याचे कामकाज राष्ट्रवादी पार्टी नक्की करणार आहे .
युवा नेते सनी अहिवळे यांच्या या ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षप्रवेशाने फलटण शहरातील राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे . या पक्षप्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे . सनी अहिवळे यांच्यामुळे आगामी काळात राजे गटाची होणारी संभाव्य गळती कोण थांबवणार , याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .



