फलटण :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण शहराच्या वतीने गुरुवार दिनांक 30/10/2025 रोजी दुपारी 12 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मंगळवार पेठ फलटण येथे मा विजय येवले जिल्हा सचिव यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली हे बोलत असताना त्यांनी 3 नोव्हेंबर रोजी महाड येथे मा ना रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापन दिन साजरा होणार असून तरी फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जास्तीत जास्त या वर्धापन दिनाला जायचे आहे असे त्यांनी आवाहन केले या कार्यक्रमास रिपाइंचे मा राजु मारुडा जिल्हा उपाध्यक्ष संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर तालुका सचिव दिपक अहिवळे व परविन शेळके तेजस काकडे उपाध्यक्ष फलटण महिलाआघाडीचे श्रीमती विमल ताई काकडे अध्यक्षश्रीमती मिनाताई काकडे राजेंद्र काकडे विशाल मोहिते अमित काकडे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते



