विषय फलटण शहर व तालुक्यातील बांधकाम बोगस नोंद झाली असून कामगार उपयुक्त यांनी सगळ्या नोंदी ची फेर तपासणी करण्या बाबत
मोहदय् महाराष्ट्रात बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्याने या विषयावरून व्यापक चौकशी सुरू झाली आहे. ही चौकशी कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे कामगारांना न्याय मिळेल याची आशा आहे.
कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडला गेला आहे. यात कामगारांना नोंदणीसाठी अनावश्यक पैसे मागणे, नोंदणी प्रक्रियेतील विलंब, आणि कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. पत्रात या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची उदाहरणे दिली गेली आहेत आणि या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आहोत व
“बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचार हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी ही चौकशी महत्त्वपूर्ण आहे.”
बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचार हा एक जुना मुद्दा आहे ज्यावर अनेकदा प्रकाश पाडला गेला आहे. या प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागते आणि त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण येतो. या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई केल्यास कामगारांना न्याय मिळेल आणि त्यांच्या हिताचे रक्षण होईल.
काही दिवसापूर्वी फलटण येथील ऐका सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून फलटण येथील विविध संघटनाची चौकशी तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी समिती स्थापन करा, अधिकारी व संस्था यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करा असे सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्रामध्ये विषयांमध्ये नमूद आहे
त्याअनुषंगाने फलटण येथील जवळपास ३३ विविध संघटनेला सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पत्राद्वारे सांगितले होते सदर पत्रात नमूद असे केले होते की , तक्रारीस अनुसरून संघटनेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, संघटनेच्या घटनेची प्रत, सभासद नोंदणी करीता आवश्यक कागदपत्रे, नोंदणी/ नुतनीकरण वर्गणी फी पुस्तक, पावती संघटनेचे अद्यावत लेखापरीक्षण अहवाल तसेच संबंधित ठेकेदार यांनी हजेरी पत्रक, पगारपत्रक, बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात पगार केल्याचा पुरावा, PF फंड, ठेकेदाराचे अनुज्ञाप्ती त्या अनुषंगिक सर्व परिपूर्ण / आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे सांगून देखील यावर लक्ष नसल्याचे दिसले आहे.
खर तर
राज्यातील कामगारांच्याहक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध तीव्र भूमिका घेत कामगार संघर्ष संघटनेचे च्या वतीने ज्यांनी कामगारांचे हक्क डावलले आहेत त्यांच्यासाठी लवकरच कठोर कारवाई होणार आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनाला चाफ देण्याची तयारी सुरू आहे. ही घोषणा कामगारांच्या हक्कांसाठी होणाऱ्या संघर्षाला नवी दिशा देणार आहे.
राज्यात सुमारे ३० लाख कामगार विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, पण त्यांचे मूलभूत हक्क अनेकदा दुर्लक्षित होत असल्याचा आरोप सतत उभा राहतोय अनेक ठिकाणी नियोक्ते व अधिकाऱ्यांकडून कामगारांचे पगार, सुट्ट्या, आरोग्य सुविधा तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम यांची पूर्णपणे दखल न घेता कामगारांविरुद्ध अन्याय केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अघोषित काम आणि चुकीच्या प्रकारे कामगारांचा गैरवापर हा देखील मोठा प्रकार आहे. कामाची नोंद न करण्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते आणि त्यांचे सामाजिक सुरक्षेचे अधिकारही धोक्यात येतात. अशा प्रकारच्या अघोषित कामांवर आता कडक कारवाई होण्याची मागणी संघटना करत आहे.
“कामगारांचे हक्क जे डावलले गेले आहेत, त्या सगळ्यांसाठी आम्ही लवकरच रिंगणात उभे राहणार आहोत. चुकीच्या वागणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि नियोक्त्यांना योग्य ती शिक्षा होणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यातून कामगारांच्या न्यायासाठी संघटनेची भूमिका किती ठाम असून ती पुढे कशी वाढणार आहे हे स्पष्ट होते.
कामगारांनी आपले हक्क जाणून घेणे आणि त्यासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे. तसेच, चुकीच्या प्रकारे कामगारांचा हुकूम निघवणारे अधिकारी आणि नियोक्ते यांना कायदेशीर कार्यवाहीसह सामाजिक तडा बसवण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे कामगार क्षेत्रात सकारात्मक वळण आणि सुधारणा अपेक्षित आहे त्याच बरोबर कामगार उपयुक्त यांनी काही संस्थेना हाताला धरून मोठा भ्रष्टचार केला आहे जे बंगल्यात राहतात त्यांची बिगारी म्हणून नोंद आहे ज्या महिलेंचे ब्युटी पार्लर आहे त्याची सुद्धा बिगारी म्हणून नोंद आहे हे सगळे पुरावे आमच्याकडे असून सातारचे उप कामगार आयुक्त यात शामिल असून 1 जानेवारी ते आज अखेर परियंत जेवढ्या नोंदी झाल्या आहेत त्या सर्व रद्ध कराव्यात आणी वरिष्ट अधिकाऱ्यांनी चौकशीस आदेश द्यावेत अन्यथा दिनांक 29/4/2025 रोजी आत्मदाहन करण्यात येईल हे कळवे



