फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे . शिवसेना , काँग्रेस आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या , शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रख्यात सिनेअभिनेते गोविंदा फलटणमध्ये येणार आहेत . प्रभू श्रीराम मंदिरापासून रॅलीचा प्रारंभश्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा संकल्प सोडण्यासाठी ही भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे . उद्या दिनाक १ ९ रोजी सकाळी ठीक ९ : ०० वाजता ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर येथून या रॅलीला दिमाखात सुरुवात होईल . या रॅलीमध्ये आघाडीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत .
बॉलिवूड स्टार ‘ गोविंदा ‘ आकर्षणाचे केंद्र लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांच्या उपस्थितीमुळे फलटणकरांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे . आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि महायुती – आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी फलटणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे . या रॅलीच्या निमित्ताने श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आपली ताकद दाखवून देणार असून , आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रॅली निर्णायक मानली जात आहे



