फलटण नायक वृत्तसेवा : फलटण नगर परिषदेच्या रणधुमाळीला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून उद्या फलटण येथे शिवसेना व मित्र पक्षांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे यांची जाहीर सभा बारामती चौक फलटण येथे संध्याकाळी ६- ०० वाजता संपन्न होणार आहे.यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर,व प्रभागातील सर्व उमेदवार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सामाजिक व आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेल्या प्रखर वक्ता म्हणून महाराष्ट्रमध्ये परिचित असलेल्या प्राध्यापक डॉ.ज्योती वाघमारे यांनी आपल्या वक्तृत्वाच्या बळावर अनेक व्यासपीठे गाजवलेली आहेत. शिवसेना पक्षाला एका नव्या उंचीवर नेता येणे शक्य व्हावे यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांच्यावर राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. सरकारच्या वतीने विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयकपदी डॉ वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली



