मुंबई :-लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे . या दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत . महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला . राज्य सरकारने सन 2025-26 या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 22 हजार 658 कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 21 हजार 495 कोटी रुपयांची तरतूद केली आहे . यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष
विभागासाठा सहायक अनुदान म्हणून 3 हजार 960 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत . त्यातील 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे . आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3 हजार 420 कोटी रुपयांच्या सहायक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला . या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे .



