अॅड . प्रकाश आंबेडकरांनी दिलेले वचन पाळले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड . प्रकाश आंबेडकर यांनी बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे . यापूर्वी त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे वचन दिले होते , ते त्यांनी पाळले आहे . । महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समुदायाकडे सोपविण्यात यावे आणि बोधगया मंदिर कायदा , १ ९ ४ ९ रद्द करण्यात यावा , या मागण्यांच्या समर्थनार्थ १२ फेब्रुवारी २०२५ पासून बोधगया येथे बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू आहे . महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळत आहे . वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने स्वाक्षरी मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत .



