मुंबई आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत उपोषण व आंदोलनाला खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला.
मराठा समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष करत आहे. या प्रश्नाशी मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक उन्नतीचे भविष्य जोडले गेले आहे.
राज्य शासनाने या प्रश्नाची संवेदनशीलतेने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी केली.



