फलटण तालुका हा पारंपरिक शेतीप्रधान भाग. येथे शेतकरी वर्गाने आपल्या कष्टातून, घामातून आणि शेतातील संपत्तीमधून देशाला अन्नधान्य दिलं. पण दुग्ध व्यवसाय या क्षेत्राला खरी ओळख देणारा आणि शेतकऱ्यांच्या घराघरात दररोजचा रोख उत्पन्न निर्माण करणारा ठरला. या व्यवसायाला देशाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचवण्याचं श्रेय जर एखाद्या नेतृत्वाला द्यायचं असेल तर ते म्हणजे श्रीमंत संजीवराजे (बाबा).
ते खरेच आधुनिक भगीरथ आहेत. जस गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथांनी अथक प्रयत्न केले तसेच शेतकऱ्यांच्या घराघरात समृद्धी आणण्यासाठी संजीवराजेंनी आधुनिक दुग्धक्रांती उभारली.
१.सुव्यवस्थित दूध संकलन केंद्रे
२.पारदर्शक हिशेब पद्धती
३.नवीन तंत्रज्ञानाचा वापर
४.शेतकऱ्यांना योग्य दर
या मार्गाने त्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मविश्वास, सन्मान आणि आर्थिक बळ दिलं.
पण याच वेळी या क्षेत्रात काही लोकांनी चुकीचे मार्ग अवलंबले. शेतकऱ्यांना कमी भाव देऊन, दूधाचे हिशेब लपवून, फक्त स्वतःचं पोट भरणारेही आहेत. असे लोक म्हणजे जणू शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबांवर तिजोरी भरवणारे. त्यांचा व्यवसाय हा व्यवसाय नसून लूटमार आहे.
फरक असा:
संजीवराजे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दूध व्यवसाय करतात.
वाईट मार्गाने काम करणारे मात्र शेतकऱ्यांच्या घामाला पिळवटून स्वतःच्या खोट्या दिखाव्यासाठी काम करतात.
आज शेतकऱ्यांना योग्य दिशा देणारा, खरी किंमत मिळवून देणारा आणि पारदर्शकता जपणारा नेता म्हणजेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा).



