फलटण / प्रतिनिधी ) – राज्याचे जेष्ठ मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव येथील ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचा नामोल्लेख केला नाही . या ठिकाणी उपस्थित असलेल्या वन विभागातील एका महिला कर्मचारी यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवून त्या म्हणाल्या ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली आणि ती घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली त्यामुळे या कार्यक्रमात त्यांचे नाव घेणे ही मंत्री महोदयाचीमहत्त्वाची जबाबदारी होती . मात्र त्यांनी जाणीवपूर्वक नाव घेणे टाळल्यामुळे असा प्रकार मी कदाचित खपवून घेणार नाही एक वेळ मला नोकरीतून बडतर्फ केले तरी चालेल मी माती उचलून रस्त्यावर काम करेन मात्र असली कृती खपवून घेणार नाही असा जाहीर निषेध त्या महिला कर्मचारी यांनी नोंदविला . त्या महिला कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ तात्काळ संपूर्ण देशभर व्हायरल झाला यावर ॲड . बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या महिलेची फोनवरून तात्काळ संपर्क केला व मंत्री गिरीश महाजन यांचे हे कृत्य निश्चितच त्यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटीचा दाखल गुन्हा करण्यायोग्य हे कृत्य असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले . वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट केले यावर राज्याच्या विविध भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे की , या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची व त्यांच्या नेत्यांची मनोवादी वृत्ती या निमित्ताने समोर आली असून भाजपा हा जातीवादी पक्ष असून त्यांनी अनेक महापुरुषांचा वेळोवेळी अपमान केला असून अशा या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला असून भविष्यात मात्र अशा प्रवृत्तींना ठेचून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे ही अनेकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे .



