नुकताच महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले या हिंदी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे . मात्र या सिनेमातील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली असल्याचे सांगितले जात आहे . यामुळे आता यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे . तसेच मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन करत फुले सिनेमा जसा आहे तसा दाखवला नाही , तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे . महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सिनेमाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली आहे . महात्मा फुले यांच्या कार्याच्या बाबत असलेले फुले सिनेमातील काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत . शासनाला आम्ही सांगतो की महात्मा फुले यांचे वाड्मय प्रकाशित करण्यात आले आहेत .
शासनाशी आम्ही सहमत नसल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सेन्सॉर बोर्डाचा निषेध नोंदविला . महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे ते म्हणाले . पुण्यातील फुले वाड्याच्या बाहेर वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निषेध नोंदविला . मुख्यमंत्री यांना आवाहन आहे की एका बाजूला अभिवादन करताय आणि दुसऱ्या बाजूला सिनेमाला विरोध करत असाल , तर विरोधाभास नको , असे आंबेडकर म्हणाले . सिनेमा आहे तसा दाखवला पाहिजे , नाहीतर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयावर धाव घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत . यावेळी महाराष्ट्र सरकारने फुले सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात आली . महाकारस्थान्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या चित्रपटांना बळी पडू नका – किरण माने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ” चित्रपट हा त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता . परंतु चित्रपटातील १२ दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आल्यामुळे , या चिपटावर टांगती तलवार आलेली आहे .
सर्वच स्तरातून सेन्सॉर बोडांचा निषेध सुरू आहे . तसेच चित्रपटातून सत्य मांडण्यात यावे , जातीव्यवस्थेविरोधात जोतीराव फुले यांनी उठवलेला आवाजाचा इतिसाह माजण्यात यावा असे मत समाजातील विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे . अभिनेता किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून खरमरीत पोस्ट केली आहे . फेसबुक , इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी जातीभेदाला खतपाणी घालणाऱ्या विचारांच्या व्यक्तींना लक्ष्य केले आहे . तत्कालीन जातीभेदामुळे महात्मा फुलेंना सहन करावे लागलेले प्रसंग चित्रपटातून हटवण्याची मागणी ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आणि सेन्सॉरने देखील त्याप्रमाणे पाऊले उचलण्यास सांगितल्यानंतर किरण माने यांनी आपला आक्षेप नोंदवला . आपल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी चित्रपटातून सत्यप्रसंग वगळण्याची मागणी केलेल्यांना त्यांनी महाकारस्थानी म्हटले आहे . किरण माने म्हणतात , ” महाकारस्थान्यांनी ‘ स्पॉन्सर्ड ‘ केलेल्या दिग्दर्शकांनी छत्रपती शिवरायांवर सिनेमे काढून अलगद मुस्लीमद्वेष पेरला . प्रेक्षकांना
शिवरायांच्या खऱ्या सर्वसमावेशक विचारापासून दूर नेण्यासाठी रचलेले ते कपट होते . कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यामुळे त्या लोकांच्या मनात शिवरायांविषयी काय घाण भरली आहे ती बाहेर आलेली आहे . याच वृत्तीच्या पिलावळीने बनवलेले सिनेमे आपण जयजयकार करत बघितले होते , है लक्षात घ्या , महात्मा फुलेंनी अडाणी बहुजनांना नाडणाऱ्या भटशाहीला ज्या निर्दयपणे दणके दिलेत ते त्याच तीव्रतेने सिनेमात असतील का ? याविषयी मला शंका आहे . त्यांनी शोधलेली शिवरायांची समाधी , सुरू केलेला पहिला शिवजयंती उत्सव बहुजन हिंदू मुस्लिमांना एकमेकांत लढवून स्वतः वर्चस्व गाजवणाऱ्या मनुवादी वृत्तीला शह देण्यासाठी महात्मा फुलेंनी महंमद पैगंबरांवर रचलेला सुंदर पोवाडा हे सगळे त्या सिनेमात असेल का ??? ‘ माझ्या भावाबहिणींनों शक्यतो महामानवावरचे सिनेमे बघूच नका . तुमर्च महामानवांवर लैच जबरदस्त प्रेम असेल , तर महामानवांचा खरा इतिहास सांगणारी असंख्य पुस्तके आहेत , ती ‘ वाचा
ब्राह्मणवादाविरूध्दच्या लढाईचा संदर्भ न देता फुले यांचा चित्रपट कसा बनवायचा ? – सरदेसाई थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘ फुले ‘ चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला . त्यानंतर या चित्रपटाचे जयंतीनिमित्तचे प्रदर्शन पुढे ढकलले . त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत जवळपास १२ दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे . त्यामुळे चित्रपटासंबंधित सर्वांचाच आणि जनमानसाचा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त होत आहे . फुले या चित्रपटातील दृश्यांवरून वाद सुरु आहे . यावरून आता समाजातील सर्वच स्तरातून सेन्सॉर बोर्डाला खड़े बोल सुनावले जात आहेत . यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात , ‘ जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेते पक्षीय मर्यादा ओलांडून त्यांना श्रद्धांजली वाहताना पाहून आनंद झाला . तरीही , ब्राह्मण गटाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्ड त्यांच्या जीवनावरील चित्रपटात काट छाट करू इच्छित आहेत . ब्राह्मणबाद आणि जातिव्यवस्थेविरुद्धच्या त्यांच्या
तीव्र लढाईचा संदर्भ न देता फुले यांच्यावर प्रामाणिक चित्रपट कसा बनवायचा ? गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे किसी सोपे आहे , नाही का ? हिंदुस्थानातील माता – भगिनींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या , महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवनप्रवास राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘ फुले ‘ या चित्रपटात मांडला आहे . या चित्रपटाच्या निर्मात्यांना १२ बदल सुचवले आहेत . त्यामुळे त्यातील काही संवाद वगळण्याची , काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत . त्यामुळेच सर्वध स्तरातून अता सेन्सॉर बोर्ड हटावचा घोषणासुरु झालेला आहे



