फलटण ;-तालुक्यातील १३१ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत दि . २४ एप्रिल २०२५ रोजी जाहीर झाली असल्याने प्रत्येक गावा – गावात जे आरक्षण निघाले आहे त्या इच्छुकांनी आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे दिसते . सरपंच आरक्षण जाहीर झाले . परंतु निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा होईल
परंतु इच्छुक उमेदवार व भावी सरपंचांनी कामाला आत्तापासूनच सुरुवात केली आहे . फलटण तालुक्यातील बऱ्याच गावांतील नागरिक आपापल्या सोयीनुसार गावाला , वाडीवस्तीवर व शेतात स्वतःच्या वॉर्ड मध्ये राहण्यासाठी जावु लागले आहेत . त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक
गावामधुन वर्दळ वाढली आहे . आता निवडणुका जवळ आल्या असल्याने जे चेहरे कधी गावात दिसत नाहीत ते देखील गावात एकमेकांना हाय – बाय करताना दिसू लागले आहेत . गावात आता हौशे नौशे गौशै तयारीला लागले आहेत . प्रत्येक गावात वेगवेगळे पुढाऱ्यांचे राजकीय पक्ष , गट- तट आहेतच
अशा गटा – तटामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत . आपल्या गटातून एकमताने एकच उमेदवार देऊन निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला धोबीपछाड देत गावात सत्ता स्थापन करायची अशा चर्चां रंगु लागल्या आहेत . अशा एका बाजूला चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे गटातून एक उमेदवार निश्चित करणे हे ही एवढे सोपे नसते . सरपंचपदासाठी
गटातून अनेक जण इच्छुक असतात , त्यामुळे तडजोड करता करता गावातील गाव पुढाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे . निवडणूकीच बिगूल वाजलं की ज्येष्ठ काय ? आणि तरुण काय ? सगळ्यांच्या अंगात संरपच पदाच्या निवडणुकीच वारं यायला सुरुवात होते आणि सुरू होतात राजकीय डावपेच आणि
मोर्चेबांधणी , गटात आपण इतरांपेक्षा कसे सरस आहोत हे दाखवण्यासाठी इच्छुक आपल्याकडे किती गाव पुढारी आणि कार्यकर्ते आहेत यासाठी प्रयत्न करताना सर्रास दिसून येतात अनेक गावामध्ये गटागटात धुसफूस सुरु असल्याचे दिसुन येते आहे ज्या गावांमध्ये सरपंचपद
485 % महिलांसाठी राखीव आरक्षण आहे , अशा ठिकाणी इच्छुक महिला उमेदवारांच्या पतीराजांनी देखील जोरदार संपर्क व मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.सध्याच्या राजकारणात जुने व नवे असे नेत्यांचे गट असल्याची चर्चा प्रत्येक गावागावांत सुरू आहे.आता ज्येष्ठांनी थोडं थांबवून तरुणांना गावचा विकास व
कारभार चालविण्यासाठी संधी द्यावी अशी चर्चा गावागावांतील पारावर होताना दिसून येत आहे .



