फलटण तरडगाव येथे 30 – एप्रिल 2025 , रोजी भैरवनाथ देवस्थान यात्रेच्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान एका दलित कुटुंबावर जातीय हल्ला झाल्याचे निष्पक्ष प्रकरणी लोणंद ग्रामीण पोलीस स्टेशनने अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ( 1989 ) आणि IPC च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे . गुन्ह्याच्या घटनेत फलटण
तालुक्यातील तरडगाव येथील मराठा समाजाच्या सदस्यांनी करुणा दिनेश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे तसेच जातीय शिवीगाळ केल्या बाबत लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे . जिल्हाधिकारी व सहाय्यक
आयुक्त ( समाजकल्याण ) सातारा यांनी जारी केलेल्या जा.क्र.सआसकसा / नाहसं / 2023-24 / 1745 या पत्राद्वारे 24 तासांच्या आत घटनास्थळी तहसीलदार यांनी भेट देणे बंधनकारक करण्यात आहे . तहसीलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट द्यावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या ज्या पोलिसांनी कर्तव्यात
कसूर केली असेल त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवावा . या गुन्ह्यात तातडीने घ्यावयाच्या कारवाईत पंचनामा , घटनास्थळी फोटो / व्हिडिओग्राफी , साक्षीदारांचे जबाब नोंदविणे ( CRPC 164 अंतर्गत ) आणि आरोपींची तत्काळ अटक यांचा समावेश आहे . नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्यसचिव वैभवजी गीते
यांनी प्रशासनाकडे जलद न्यायाची मागणी केली असून , बौद्ध अनुसूचित जातीतील नागरिकांना मारहाण जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर क्रॉस गुन्हा दाखल केल्याने राज्य सचिव वैभव गीते यांनी शासन व प्रशासनाचा निषेध केला आहे . तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत लक्ष घालून कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी देखील केली आहे



