शुभचिंतक । फलटण । दि . २३ नोव्हेंबर २०२५ । फलटण नगरपालिका निवडणुकीतील बहुचर्चित नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा आज , रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य शुभारंभ होत आहे . या निमित्ताने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . श्रीमंत अनिकेतराजे यांच्या प्रचाराचा हा महत्त्वाचा शुभारंभ सकाळी ठीक ९ : ०० ते १२:०० या वेळेत होणार आहे . श्रीराम मंदिर येथे या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
या प्रचार शुभारंभासाठी शिवसेना पक्ष , काँग्रेस पक्ष तसेच कृष्णा भीमा कोरेगाव आघाडी या सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येणार आहेत . सर्व प्रमुख पक्ष आणि आघाड्या एकत्र येत असल्याने ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे . नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुरंगी लढत निश्चित झाली असताना , या जाहीर सभेमधून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे आपल्या निवडणुकीची भूमिका आणि विकासाचे ध्येय स्पष्ट करणार आहेत . फलटणमधील सर्व नागरिकांनी या प्रचार शुभारंभ आणि जाहीर सभेला उपस्थित राहावे , असे आवाहन संयोजकांनी केले आहे .



