नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी ( दि . 10 ) युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच त्याचे पाककडून उल्लंगन झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत . नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी पाक रेंजर्सकडून गोळीबार झाल्याचे वृत्त आहे . तथापि , अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही . दरम्यान , जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘ एक्स’वर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये , ‘ ही कोणत्या प्रकारची युद्धबंदी आहे ? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज सतत ऐकू येत आहेत , ‘ असे म्हटले आहे . ओमर अब्दल्ला यांनी आणखी एक टिट केले
ओमर अब्दुल्ला यांनी आणखी एक ट्विट केले आहे . त्यात ते म्हणतात की , ‘ येथे कोणताही युद्धविराम झालेला नाही . श्रीनगरमध्ये हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत . ‘ या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे .
ओमर अब्दुल्ला यांच्या या ‘ एक्स ‘ पोस्टमुळे पाकिस्तानकने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त अनेक टीव्ही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले . मात्र , भारतीय लष्कराकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही . तसेच त्यावर कसलेही निवेदन जाहीर केलेले नाही
दरम्यान , संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांशी पडताळणी केल्याशिवाय युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या बातम्या प्रसारित करू नयेत अशी विनंती माध्यमांना करण्यात येत आहे . काही चॅनेल्सनी स्थानिक आणि अप्रमाणित माहितीच्या आधारे अशा बातम्या प्रसारित केल्या आहेत . त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित अशा बातम्या टीव्ही आणि सोशल मीडियावरून हटवाव्यात , असे सांगण्यात आल्याचा संदेश सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत आहे .
भारत आणि पाकिस्तानमधील 86 तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी 5 वाजता संपले . दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली . पण त्यानंतर अवघ्या 4 तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले . जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या केल्याचे काहींचे म्हणणे आले . शनिवारी रात्री , पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा जोरदार गोळीबार केल्याचा व्हि एएनआयने त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला . दरम्यान , भारतीय लष्कराने या वृत्ताल अद्याप दुजोरा दिलेला नाही
मिळालेल्या माहितीनुसार , पाकिस्तानने अखनूर , राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफ गोळे डागल्याचे समोर आले . त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला . जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले . भारतीय सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत
याशिवाय राजस्थानमधील पोखरणमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले होत असल्याचे वृत्त समोर येत असून भारतीय संरक्षण यंत्रणा त्यांना नष्ट करत आहे . राजौरीमधूनही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे .



