नैऋत्य मान्सूनने शनिवारी ( २४ मे ) केरळमध्ये वेळेपूर्वीच दस्तक दिली असून , राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . भारतीय हवामान विभागाने ( IMD ) याबाबत माहिती दिली असून , हे १६ वर्षांतील सर्वात लवकर मान्सून आगमन आहे . याआधी २०० ९ साली २३ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता
हवामान विभागाने कोकण , गोवा , मध्य महाराष्ट्र , किनारी कर्नाटक , दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे . त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे
मान्सूनचे सामान्य वेळापत्रक नैऋत्य मान्सून सामान्यतः १ जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो आणि पुढील काही आठवड्यांत संपूर्ण देश व्यापतो . वायव्य भारतातून त्याची माघार १७ सप्टेंबरपासून सुरू होते आणि साधारणतः १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे परत जाते .
मागील वर्षांतील मान्सून आगमनाच्या तारखा : • 2023 – 8 जून • • 2022 – 29 मे – • 2021 – 3 जून • 2020 – 1 जून • 2019 – 8 जून • 2018 – 29



