सातारा , दि . 19 : माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे . तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य , पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे , यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले . मवळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री . पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते .
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील , खासदार नितीन पाटील , आमदार सचिन पाटील , अखिल , , भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा . मिलिंद जोशी , कार्यवाह सुनिताराजे पवार , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी , पुणे विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीष पाटणे , जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते . उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , सर्व पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे . नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे , असे सांगून उपमुख्यमंत्री श्री . पवार म्हणाले , कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( एआय ) वापर आता पत्रकारितेतही
देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे . तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य , पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे , यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले . मवळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री . पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी
होत आहे . हे तंत्रज्ञान आता पत्रकारांनीही अवगत केले पाहिजे . पत्रकारितेचे मूल्ये ही केवळ पत्रकारच जपू शकतात हेही लक्षात ठेवले पाहिजे . पत्रकारांवर हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने कसे कयदेशीर कार्यवाही केली जाईल आसे ते म्हणाले



