By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: १४ ते २५ मे दरम्यान फलटणला श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > १४ ते २५ मे दरम्यान फलटणला श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन
फलटण

१४ ते २५ मे दरम्यान फलटणला श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन

Prashant Ahiwale
Last updated: May 8, 2025 10:20 pm
Prashant Ahiwale Published May 8, 2025
Share
SHARE

श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान , फलटणच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही दि . १४ ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून फलटण शहर व तालुक्यातील अबालवृद्धांनी त्यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे

श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४७ वी पुण्यतिथी दि . १४ मे २०२५ आणि माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची १०० वी जयंती दि . २५ मे २०२५ रोजी येत असून त्या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठाच्यावतीने दि . १४ ते २५ मे दरम्यान स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . दि . १४ मे रोजी स्मृती महोत्सवाचे उदघाटन आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे . श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सहकार महर्षी स्व . तात्यासाहेब कोरे यांना जाहीर झाला असून त्यांच्यावतीने डॉ . विनय कोरे यांच्याकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे . २१ हजार रुपये रोख , सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ , पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे

गुरुवार दि . १५ मे रोजी स्वरश्रुती हा श्रीकांत सावंत प्रस्तुत जुन्या नव्या हिदी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे . शुक्रवार दि . १६ मे रोजी गिर्यारोहण काळाची गरज व तरुणाईला आवाहन या विषयावर दिलीप केशवराव नाईक निंबाळकर यांचे व्याख्यान होणार आहे . माजी आमदार दिपकराव चव्हाण हे अध्यक्षस्थानी असतील . शनिवार दि . १७ मे रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद भीमसेन जोशी यांचा संतवाणी हा कार्यक्रम होणार आहे . रविवार दि . १८ मे रोजी छ . राजाराम महाराज , महाराणी ताराबाई साहेब आणि मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा या विषयावर प्रा . गणेश राऊत यांचे व्याख्यान होणार आहे . अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील

सोमवार दि . १ ९ मे रोजी मी जिजाऊ बोलतेय हा एकपात्री नाट्य प्रयोग व व्याख्यान : डॉ . प्रतिभा जाधव – निकम , नाशिक . मंगळवार दि . २० मे रोजी मकरंद टिल्लू सादर करतील हसण्यासाठी जगा , जगण्यासाठी हसा हा एकपात्री प्रयोग . बुधवार दि . २१ मे रोजी तापमान बदलाची कृषी ग्रामीण विकासापुढील आव्हाने या विषयावर पोपटराव पवार यांचे व्याख्यान , श्रीराम सहकारी साखर कारखाना लि . , फलटणचे चेअरमन डॉ . बाळासाहेब शेंडे अध्यक्षस्थानी असतील . ( फलटण तालुक्यातील सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी मार्गदर्शक व्याख्यान

गुरुवार दि . २२ मे रोजी बबल शो : बोलक्या बाहुल्या हा शो चैत्राली माजगावकर सादर करतील . शुक्रवार दि . २३ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी शिक्षक व सेवक कलावंत सादर करतील कलाविष्कार , शनिवार दि . २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी विविध शाखांतील विद्यार्थी कलावंत सादर करतील कलाविष्कार , रविवार दि . २५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप , बक्षीस वितरण व सत्कार . हस्ते आ . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , माजी आमदार दिपकराव चव्हाण . स्मृती महोत्सवातील दि . १४ ते २५ मे दर आयोजित सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल

१४ ते २५ मे दरम्यान आयोजित सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल प्रांगणातील रंगमंचावर दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहेत

You Might Also Like

फुले चित्रपटास मनुवादी ब्राह्मण विरोध!

सौ . प्रीती संजय भोजने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

मा केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर रोजी आर पी आय (आठवले) गटाचा वर्धापन दिन महाड येथे संपन्न होणार!

वादाच्या भोवर्‍यात ‘फुले’ चित्रपट !

स्वयम घोषीत गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

माता रमाई फूड्स प्राँडक्ट्स घेऊन येत आहे दिपावली फराळ धमाका बंपर धमाका आँफर !

Prashant Ahiwale Prashant Ahiwale October 16, 2025
आशय हणमंत अहिवळे प्रभाग३ क्र. अ जा अपक्ष उमेदवार म्हणून बु मोहनराव अहिवळे तात्यांचा जनसेवाचा वारसा घेऊन जनतेचा अपेक्षाची पुर्तता करणार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर
तू मला खूप आवडतेस , तू जर नाही म्हणाली तर … ; बारामतीमध्ये तरुणीचा विनयभंग तुझ्याविषयी काही भावना नाहीत , असं स्पष्टपणे सांगितलं .
Homeफलटण ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गायकवाड दाम्पत्यांचे वाचले प्राण.!
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account