पुण्यातील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून अचानक कोसळलेल्या या फुलामुळे इंद्रायणी नदीत 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे पुण्यातील मावळ तालुक्यात हा इंद्रायणी पूल असून तो अचानक कोसळला . रविवारी दुपारच्या वेळी ही घटना घडली असून मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी ही घटना घडली . या ठिकाणी अनेक पर्यटक नेहमीच भेट देण्यासाठी ओलांडण्यासाठी येतात . कुंडमळा कुंडमळा इंद्रायणी नदीवर हा पूल होता . हा पूल नेमका आज दुपारी कोसळला प्राथमिक अंदाजानुसार 20 ते 25 जण या पुलावरून कोसळल्याने वाहून गेल्याची माहिती आहे . आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जणांचा अद्यापपर्यंत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे .पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम देखील स्थानिक ठिकाणचे स्वयंसेवक , पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने सुरू आहे . आपुल अचानक कसा कोसळला याची मात्र माहिती अद्याप पर्यंत मिळाली नसून पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती आज रविवारचा सुट्टीचा दिवस होता रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली



