फलटण
फलटण येथील हिंदू मातंग समाजातील संदीप रिटे यांची अतिशय निर्घुन पद्धतीने हत्या झाल्याने फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप रिटे यांच्या कुटुंबीयांची भेट वैभवजी गीते यांनी घेतली , संदीप रिटे यांच्यानंतर कुटुंबियांमध्ये पत्नी व दोन मुले यांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामध्ये फोन करून घटनेची सविस्तर माहिती उपलब्ध केली. दोन आरोपींना अटक केली असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण हे करत आहेत.सातारा जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
फलटण तालुक्यात अलीकडच्या काळात अनुसूचित जाती आणि जमातींवर अन्यायाच्या घटना वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कांबळे हे अनुसूचित जाती जमातींमधून निवडून आले असूनसुद्धा अत्याचार कमी होण्याऐवजी अन्याय अत्याचार मध्ये गुन्हे वाढच झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये मागासवर्गीयांवरील व अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या नागरिकांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले असून
फलटणचे आमदार हे अनुसूचित जातीचे असताना देखील हिंदू मातंग समाजातील संदीप रिटे यांची हत्या झाल्याचे माहिती असताना देखील त्यांनी अद्याप पीडित कुटुंबीयांच्या घरी भेट दिलेली नाही. त्यामुळे मातंग समाजामध्ये व पीडित कुटुंबियांमध्ये फलटण आमदारांच्या बाबतीत मनामध्ये रोष दिसून आला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी या घटनेला भेट देऊन तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्व प्रकारचे आदेश संबंधितांना देणे बंधनकारक आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार फलटण यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. परंतु फलटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी सुद्धा कर्तव्यात कसूर केलेली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त यांना भेटणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना वैभव गीते यांनी दिली. फलटण तालुका अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करावा अशी मागणी देखील वैभव गीते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये केली आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी अन्यायाच्या घटना घडल्याच्या बातम्या येत आहेत, परंतु या ठिकाणी आमदारांची उपस्थिती होती की नाही हे माहिती नसल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत.
फलटण तालुक्यातील काही घटनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया निराशाजनक ठरली आहे. जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांचे आदेश असतानाही प्रांत अधिकारी, पोलिस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अशा अधिकाऱ्यांची उपस्थिती घटना स्थळी दिसून येत नाही. प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी जाणून बुजून ॲट्रॉसिटी ॲक्टरच्या मासिक बैठका नियमित घेत नाहीत. तहसीलदार जातीयवादी भूमिका घेऊन घटनास्थळी भेटी देत नाहीत. त्यामुळे डी.वाय.एस.पी पोलीस निरीक्षक व गाव पातळीवर पोलीस पाटील हे हलगर्जीपणा करतात. त्यामुळेच मागासवर्गीयांवरील बौद्ध व अनुसूचित जाती जमातींच्या नागरिकांवरील अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात भरघोस वाढ झाली आहे.
हे चित्र फलटणच्या प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
फलटण तालुक्यात नुकत्याच घडलेल्या एका भयंकर घटनेच्या निमित्ताने नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिज संघटनेकडून महसूल विभागातील जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी, तहसीलदार यांचा व पोलीस विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरिक्षक या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना रिठे कुटुंबातील युवकांच्या मृत्यूसंबंधित आहे आणि त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अपेक्षित प्रतिक्रिया दिली नसल्याचा आरोप केला जात आहे



