साताऱ्याच्या प्रतिसरकारला संमेलनाच्या माध्यमातून अनोखं अभिवादन
विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र यांच्यावतीने 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे . विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ . धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉ . जालिंदर घिगे यांनी ही माहिती दिली . साताऱ्याच्या प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहेक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात संमेलन घेण्याचे ठरले . सातारा येथे यापूर्वी 4 थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन 2002 मध्ये झाले होते . ज्येष्ठ विचारवंत डॉ . बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते . आता 22 वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे .साताऱ्याचे प्रतिसरकार हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी , कष्टकरी , शेतमजूर , महिला यांना सोबत घेऊन जाणारे होते , त्यांच्या उत्कर्षाचं काम करणारं होते . त्यांनी केवळ घोषणा केल्या नाहीत तर गरिबातील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेऊन सातत्यानं कार्य केले . म्हणून आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ साताऱ्याच्या प्रतिसरकारला महत्त्व देतो आणि त्यासाठीच सातारला होणारे नियोजित 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील व साताऱ्याच्या प्रतिसरकारला आम्ही समर्पित करत आहोत . या संमेलनात लोक साहित्य आणि साताऱ्याचे प्रतिसरकार , वारकरी आणि साताऱ्याचे प्रतिसरकार , साहित्यातील महिलांच्या प्रतिमा व विद्रोही साहित्य , स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र लढ्यात साहित्यिक , कलावंतांचे योगदान , आदिवासींचे सशस्त्र लढे व स्वातंत्र्य चळवळ , भारतीय संविधानाची 75 वर्षे या अनुषंगानं चर्चासत्र , परिसंवाद तसेच विद्रोही शाहिरी जलसा , कवी संमेलन आयोजित ^ जाणार आहेत ” . अशी माहिती प्रवक्ते अविनाश कदम आणि विजय मांडके यांनी दिलीविद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्राच्यावतीनं 14 वे साहित्य संस्कृती संमेलन पुणे येथे 10 व 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले होते . त्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर हे होते . पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी ( मुंबई ) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर , औरंगाबाद , सातारा , सावंतवाडी , पंढरपूरधुळे , सोलापूर , इंदापूर , सांगली , राहुरी , बीड , शहादा , पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेतअध्यक्ष डॉ यशवंत मनोहर , प्रा . डॉ . आ . ह . साळुंखे , डॉ . बाबा आढाव , प्रा . डॉ . बाबुराव गुरव , कॉ . नजूबाई गावित , डॉ . भारत पाटणकर , कवी वाहरु सोनावणे , रुपा बोधी यांचा या संमेलनात यथोचित सत्कार करण्यात येणार आहे . क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड . सुभाषबापू पाटील , व्ही . वाय . आबा पाटील , प्रसेनजीत गायकवाड , शिवराम सुकी , कॉ . अशोक जाधव , ह.भ.प. डॉ . सुहास फडतरे , डॉ . बापू चंदनशिवे , प्रा . दिनकर दळवी , प्रा . सुधीर अनवले , ज्योती आदाटे , ऍड . सरफराज बागवान , ऍड . राजेंद्र गलांडे , प्रा . सीमा मुसळे , शिवराम ठवरे आदी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सक्रीय झाले आहेत



