भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सातारा पूर्व अंतर्गत विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा त्यांचे पालकांसह सत्कार व कौतुक सोहळा, फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी या ठिकाणी आज सायंकाळी सहा वाजता जिल्हा शाखा सातारा पूर्व अध्यक्ष आद. नानासाहेब मोहिते सर यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य संघटक, असी. स्टाफ ऑफिसर, प्रभारी पुणे व सातारा जिल्हा आद. दादासाहेब भोसले यांचे उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा शाखा सातारा पूर्व सरचिटणीस आद. अरुण गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक केले. यश संपादन केलेल्या मान्यवरांचे ओळख करून देऊन त्यांच्या क्षेत्रात त्यांनी कशा प्रकारे यश मिळवले हे आयु. मिलिंद अहिवळे यांचे वतीने आद. आयु. सिद्धार्थ अहिवळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येक यशस्वीतांचे यश कशा पद्धतीने साकार झाले याची गुरुकिल्लीच उपस्थितांना सांगून आपल्याच न्हवे तर प्रत्येक समाजातील विध्यार्थ्यांना या बाबत मार्गदर्शन करून कश्या पद्धतीने साकार करता येईल या साठी पुणे, मुंबई, लंडण या ठिकाणी ऑफिस काढून मार्गदर्शनाचे काम करत असल्याचे सांगितले. आद. लोंढे सर, आद. दत्ता अहिवळे सर व आद. सुहास अहिवळे सर



