फलटण प्रतिनिधी : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये , यासाठी संग्राम अहिवळे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे . या उपक्रमांतर्गत दि . ३१ रोजी नागरिकांसाठी मोफत ४ लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे . दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल होत असतात . ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळावा , या उद्देशाने ही वाहनसेवा सुरू करण्यात आली आहे . या मोफत वाहनसेवेचा लाभ युवक , ज्येष्ठ नागरिक , महिला तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घेत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . सामाजिक बांधिलकी जपत संग्राम अहिवळे यांनी राबवलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे .



