फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण , श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते .
पाण्यासाठी केलेला संघर्ष तरुण पिढीने समजून घ्यावा आपल्या भाषणात रामराजे म्हणाले की , ” मालोजीराजेंची संस्कृती आणि विचार हेच आमचे राजकारणातील भांडवल आहे . आमदार झाल्यावर मी धरणे आणि पाण्यासाठी जीवाचे रान केले . नीरा – देवघरचे काम एकाग्रतेने पूर्ण केले , पाटण तालुक्यातील पाणी शोधून आणले . आजच्या तरुण पिढीला हे पाणी आणण्यासाठी आम्ही केलेले कष्ट कदाचित माहित नसतील , पण त्यांनी हे प्रयत्न समजून घ्यावेत आणि मतदान करताना त्याची नोंद घ्यावी . “
फलटणच्या विकासाची तुलना आणि राजकीय संस्कृती ‘ फलटणची बारामती का झाली नाही ? ‘ या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की , शरद पवार यांना सुरुवातीपासून यशवंतराव चव्हाणांची साथ मिळाली आणि तिथे राजकीय दुजाभाव ठेवला जात नाही . पवार कुटुंबीयांचा शब्द तिथे अंतिम मानला जातो , तशी स्थिती दुर्दैवाने आपल्याकडे निर्माण होऊ शकली नाही . “ मला १५ वर्षे मंत्रिपद आणि ७ वर्षे सभापती पद मिळाले , पण मी नेहमी साहेबांकडे पदाऐवजी फलटणच्या पाण्यासाठी मागणी केली , ” असेही त्यांनी नमूद केले .
विरोधकांवर कडाडून टीका विरोधकांचा समाचार घेताना रामराजे म्हणाले : • दहशतीचे राजकारण : ” आज जे लोक मते मागायला येत आहेत , त्यांच्याकडे दहशतीशिवाय काहीही नाही . त्यांनी तालुक्यासाठी काय केले ? ” • संस्था टिकवण्याचा प्रयत्नः ” विरोधकांनी श्रीराम कारखाना आणि कमिन्स सारखे प्रकल्प बंद पाडण्याचा प्रयत्न केला . मी फलटणला गुंडगिरी आणि चुकीच्या आर्थिक राजकारणातून बाहेर काढले आहे . ” • विकासाची हमी : ” हजारो कोटींची विकासकामे मी केली आहेत . जर मी काहीच केले नव्हते , तर खासदारकीच्या वेळी माझ्या पाया पडायला का आले होता ? ” असा सणसणीत सवाल त्यांनी उपस्थित केला
भविष्याचा वेध आणि आवाहन “ मला फलटणला अत्याधुनिक करायचे आहे . आम्ही घातलेला विकासाचा पाया आणि तुमचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी मी नवी पिढी पुढे आणली आहे . जोपर्यंत विरोधकांचे आचार- विचार बदलत नाहीत , तोपर्यंत माझा विरोध कायम राहील , ” असा इशारा त्यांनी दिला . फलटणच्या जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून तालुक्याचे भविष्य सुरक्षित करावे , असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटी केले .



