जिल्हा माहिती कार्यालयातील मराठी , हिंदी व इंग्रजी दैनिके व मासिकांची रद्दी विक्री करावयाची आहे . त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत . तरी ज्यांना रद्दी घ्यावयाची आहे त्यांनी आपली दरपत्रके दि . 5 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात द्यावीत . लिफाफ्यावर रद्दी दरपत्रक असे नमुद करावे . मुदतीनंतर आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार केला जाणार नाही , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी , सातारा यांनी केले आहे . दरपत्रके कार्यालयाचा पाठविण्यासाठी पत्ता : जिल्हा माहिती कार्यालय , 3 रा मजला , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , सातारा .



