जळगाव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे . येथे ऑनर किलिंगची घटना घडली आहे . एका निवृत्त पीएसआय बापाने आपल्या मुलीवरच भर लग्नात घुसून गोळीबार केला आहे . या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे . जळगाव जिल्ह्याच्या चोपडा येथे ही घटना घडली आहे . किरण मांगले असं गोळीबार करणाऱ्या बापाचं नाव आहे . त्यानंतर लग्नाला आलेल्या वऱ्हाडींनी गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करून त्यालाही गंभीर जखमी केलं आहे . या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्राथमिक माहितीनुसार , प्रेम विवाह केल्याच्या रागातून पीएसआय बापाने हे कृत्य केलं आहे . ही घटना चोपडा शहरात घडली आहे . किरण मांगले हे सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय आहेत . त्यांनी आपल्या मुलीवर लग्नातच बेछूट गोळीबार केला . या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला . तर जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे . या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे
मिळालेल्या माहितीनुसार , वर्षभरापूर्वी तृप्तीने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता . लग्नानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं . अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघेही शनिवारी ( ता .26 ) चोपडा शहरात आले होते . ते आल्याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले . तेथे येऊन लग्नस्थळी पोहोचत तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या . या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे .
गोळीबारानंतर संतप्त वऱ्हाडी मंडळींनी किरण मांगले यांच्यावर हल्ला केला . यात मांगले गंभीर जखमी झाले . किरण मांगले याच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत . यामध्ये जावई अविनाश वाघही जखमी झाला आहे . त्याच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ . महेश्वर रेड्डी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे . या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपड़ा शहरात खळबळ उडाली आहे पुढील तपास केला जात आहे



