१४एप्रिल २०२५ पासून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे . त्यामध्ये दररोज एका महापुरुषास अभिवादन करून , महापुरुषांचे विचार विशिष्ट चौकटीत न राहता , ते सार्वत्रिक व्हावे , त्यांचे विचार सर्वांना समजावे यासाठी सर्व महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वितरित केली जाणार आहेत . दि . १ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे वितरण आले . तर आज २ एप्रिल रोजी , प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन समोर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पपुतल्यास अभिवादन करून , विविध महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे वितरण शिवप्रतीष्ठान फलटण आणि मोती चौक तालीम शिवजयंती महोत्सव फलटण यातील पदाधिकाऱ्यांना करण्यात आले . यावेळी जयंती मोहोत्व समिती मधील गणेश अहिवळे , अजय काकडे , गोविंद काकडे , सुरज काकडे , सिद्धार्थ अहिवळे . भूषण बनसोडे , चंद्रकांत मोहिते , मंगेश सावंत , कपिल काकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .



