Reading:खामगाव येथे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची भीम जयंती साजरी ; बौद्ध विहार मध्ये ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन : ग.वी. भोसले प्रतिष्ठान साखरवाडी यांच्या वतीने पुस्तके देऊन मोठी मदत
खामगाव येथे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची भीम जयंती साजरी ; बौद्ध विहार मध्ये ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन : ग.वी. भोसले प्रतिष्ठान साखरवाडी यांच्या वतीने पुस्तके देऊन मोठी मदत
फलटण :–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त अमर भीम तरुण मंडळ खामगाव यांचे तर्फे नवीन वैचारिक संकल्प राबवत गावातील बौद्ध विहारामध्ये ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
तरुणांनमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वातावरण मिळावे या उद्देशाने हे वाचनालय मोफत सुरू केले असून त्यामधून उत्तम तरुण पिढी निर्माण व्हावी तसेच अधिकारी घडावेत हा या मागचा उद्देश आहे.
तरुणांना अभ्यासिकेसाठी शहरामध्ये जावे लागते हजारो रुपये फी देखील त्याठिकाणी घेतली जाते परंतु त्याठिकाणी फक्त शांत बसण्याचे अभ्यासाचे वातावरण निर्माण केलेले असते त्याठिकाणी पुस्तक उपलब्ध नसतात. या सर्व गोष्टीचा विचार करता खामगाव गावात अमर भीम तरुण मंडळाच्या सदस्यांनी भीम जयंती निमित्त संकल्पना राबवत उत्तम अशी सुसज्ज स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसहीत वाचनालय व इतर अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे ग्रंथालय सुरू केले आहे.
ग्रंथालयाची वैशिष्ठे म्हणजे उत्तम फर्निचरची बैठक व्यवस्था उत्तम कुशनच्या खुर्च्या तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.
ग्रंथालयाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती ही ग.वी. भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सचिन गणपतराव भोसले(Assistant General Manager Shree Dutta India Pvt. Ltd. Sakharwadi ), बी.जे. इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक राहुल दिलीप जगताप साहेब, खामगांव ग्रामपंचायत सरपंच अर्चना नितीन जगताप, उपसरपंच किसन आप्पा झेंडे, खामगावचे ग्रामसेवक जाधव साहेब, ग्रामपंचायत सदस्य हिराचंद्र चाबुकस्वार, सपना वैभव वारे, संतोष महादेव सावळकर, प्रदीप जाडकर, प्राथमिक शाळा खामगांव शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थितांनी या उपक्रमास पुस्तके देऊन खूप मोठी मदत केली व कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच भविष्यात आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.
यावेळी ग.वी. भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गणपतराव भोसले यांनी व विजय दत्तात्रय नलावडे ( Deputy Engeneer Watter Resource department of Maharashtra ) यांनी देखील पुस्तक देऊन मोठी मदत करून ग्रंथालयास भेट दिली.