फलटण :-फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गुरुवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे . आधी ठरलेली १० वाजताची वेळ बदलल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी दिलीफलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण नगरपरिषद प्रचार सभेसाठी गुरुवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे . यापूर्वी ही सभा सकाळी १० वाजता होणार होती ; मात्र वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह 4 नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी दिली .फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येणार आहेत . या सभेची वेळ बदलण्यात आली असून ती सकाळी ९ वाजता होणार आहेपूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सभा सकाळी १० वाजता होणार होती . मात्र दौऱ्याच्या नियोजनात बदल झाल्याने सभेची वेळ एक तास आधी करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले .या संदर्भातील अधिकृत माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी दिली . नागरिकांनी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी बदललेल्या वेळेनुसार उपस्थित राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे .



