फलटण : तहसीलदारांच्या दालनात चक्क राजकीय पदाधिकाऱ्यांनी फलटणचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे,पंचायत समितीचे संबंधित विभागाचे अधिकारी यांनाच बाजूला सारत त्यांनाच कोपऱ्यात बसवून त्यांच्याच दालनात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानिक पदाची कुचेष्टा केल्याचा आरोप नागरिकांमधून होताना दिसत आहे.फलटण तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून फलटण तालुक्यात जमिनी,पिके,रस्ते,घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यासंदर्भात फलटण तहसील कार्यालयात फलटण शहर आणि ग्रामीण भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असलेने सदर परिस्तीचा आणि शासकीय आपत्कालीन व्यवस्थेची आढावा घेणेसाठी तहसीलदार कार्यालय फलटण येथे अती तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार सारख्या संविधानिक पदाच्या व्यक्तीला राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाचा ताबा घेऊन त्यांनाच कोपऱ्यात बसवल्याने सत्तेच्या नव्या वारूत फलटणच्या अधिकारी वर्गाची दयनीय अवस्था झाल्याची चर्चा दिवसभर तालुक्यात होतना दिसत होती.
फलटण तालुक्यातील अधिकारी वर्गाला आपल्या संविधानिक पदाचा विसर पडला असून राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करण्यात अधिकाऱ्यांचा दिवस जाताना दिसत आहेत. शासकीय आपत्कालीन व्यवस्थेच्या आढावा बैठकीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या आजी माजी सदस्यांना तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीला बोलवणे उचित होते परंतु तसे होताना दिसले नाही.सदर बैठकीला विशिष्ट पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून अधिकारी वर्गाने आपली स्वतःची व संविधानाची चेष्टा केल्याची चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांनी चक्क तहसीलदारांना बसण्यासाठी दाखवला कोपरा ; सत्तेच्या नव्या वारूत फलटणच्या अधिकारी वर्गाची दयनीय अवस्था
Leave a comment



