प्रथम क्रमांकासह अनुसूचित जाती प्रवर्गात महाराष्ट्रात फलटणचे नाव केले उज्वल
फलटण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC ) घेण्यात आलेल्या परीक्षेत फलटण येथील मंगळवार पेठेतील कु . अमृता ( गौरी ) बाळासाहेब अहिवळे हिने घवघवीत यश संपादन केले आहे . अनुसूचित जाती ( SC ) प्रवर्गातून तिने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून , तिची निवड उद्योग निरीक्षक ( Industry Inspector ) व तांत्रिक सहाय्यक ( Technical Assistant ) या पदांसाठी झाली आहे . या यशाने तिने फलटण तालुक्याचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले आहे . या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथाआमदार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह ना . निंबाळकर , श्रीमंत संजीवराजे विजयसिंह ना . निंबाळकर , श्रीमंत रघुनाथराजे विश्वजीतराजे ना . निंबाळकर यांनी कु . अमृता यांचा यथोचित सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही त्यामुळे सर्वांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाबाबतीत किंवा अन्य कोणत्याही बाबतीत कोणाला कधीही कसलीही अडचण आली तरी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असे यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले .
कु.अमृता ही अभ्यासू वृत्तीची असून , तिने आपल्या मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे . तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे . तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समस्त अहिवळे परिवार आणि मित्रमंडळी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे . फलटणच्या युवा पिढीसाठी तिचे हे यश निश्चितच प्रेरणादायक आहे असे शेवटी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले .



