आटपाडी ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्चला फलटणकरांचा जाहीर पाठिंबा
फलटण दि.५ जून २०२५ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने आटपाडी येथून हटवल्याच्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथील कार्यकर्त्यांनी, याचा निषेध नोंदवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुन्हा स्थापित करावा अशी मागणी घेऊन, आटपाडी ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च काढला आहे, दि. ३ जून रोजी हा लॉंग मार्च फलटण येथे आला असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तसेच भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती व इतर सामाजिक संघटनांनी लॉंग मार्चचे स्वागत करून जाहीर पाठिंबा दिला व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले.
आटपाडी ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्चला फलटणकरांचा जाहीर पाठिंबा
Leave a comment



