By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: पत्नीच्या नावे कंपनी काढून घेतली कोट्यवधी रुपयांची टेंडर जलसंपदा चा आका : कार्यकारी अभियंता अमोल निकम यांचा प्रताप ; गुन्हा दाखल करावा : सुशांत मोरे
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > क्राईम > पत्नीच्या नावे कंपनी काढून घेतली कोट्यवधी रुपयांची टेंडर जलसंपदा चा आका : कार्यकारी अभियंता अमोल निकम यांचा प्रताप ; गुन्हा दाखल करावा : सुशांत मोरे
क्राईम

पत्नीच्या नावे कंपनी काढून घेतली कोट्यवधी रुपयांची टेंडर जलसंपदा चा आका : कार्यकारी अभियंता अमोल निकम यांचा प्रताप ; गुन्हा दाखल करावा : सुशांत मोरे

Prashant Ahiwale
Last updated: May 19, 2025 10:38 pm
Prashant Ahiwale Published May 19, 2025
Share
SHARE

सातारा / प्रतिनिधी : कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत
जिहे-कठापूर उपसा सिंचन, कृष्णानगर सातारा चा कार्यकारी
अभियंता अमोल निकम यांनी वेगवेगळ्या ठेकेदारांना ७६३
कोटी ७७ लाख ६७ हजार ३८९ इतक्या रकमेची टेंडर देऊन
विविध कंपन्यांच्या नावावर आर्थिक रक्कमेच्या रुपयांचा
गफला केला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते
सुशांत मोरे यांनी केला आहे. या कंपन्यांमध्ये पत्नीला भागीदार
करुन प्रत्यक्ष कृष्णा खोऱ्याची टेंडर देऊन ठेकेदारांकडून
सरकारी पैसा लाटला आहे. या प्रकरणात सरकारी नियम
धाब्यावर बसवले गेले आहेत. ठेकेदाराच्या नावे टेंडर घेऊन
पत्नीच्या कंपन्यांच्या नावावर पैसा लाटणा-या कार्यकारी
अभियत्याची लाचलुचपत प्रतिबंधक कायदाखाली चौकशी
तसेच बेनामी संपत्ती कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला
३१ मे पर्यंत बडतर्फ करावे आणि आयकर विभाग, ईडी आणि
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी,अशी
पुराव्यानिशी तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
केली आहे. श्री. निकम यांना बडतर्फ न केल्यास योग्य त्या
न्यायालयात दाद मागण्याचा इशारा माहिती सामाजिक, माहिती
अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

याबाबत अधिक माहिती सांगताना श्री. मोरे म्हणाले, अमोल
पंडीतराव निकम, कार्यकारी अभियंता जिहे कठापूर उपसा
सिंचन विभाग सातारा या ठिकाणी गेले ६ वर्षे एकाच ठिकाणी,
एकाच हुद्दावर कार्यरत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार एक
व्यक्ती एका पदावर तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी पर्यंत राहू
शकत नाही. मात्र श्री. निकम हे स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री
महोदय यांच्या आशीर्वादाने कायम मुदत वाढ घेत आली आहे.
त्यामुळे हम करेसो कायदा अशी काहीशी प्रवृत्ती बळावत आहे.
एका पुणे विभागामध्ये मागील १५ वर्षापासून हा अभियंता
कार्यरत आहे. अतिशय दादागिरी करुन कंत्राटदारांना लुबाडणे,
स्वत:च्या नातेवाईकांचे नावावर कामे घेणे, कामाचे वाटप करणे
अशा प्रकारे सुरु आहे. स्वत:च्या भांडवली कंपन्या स्थापन
करुन पत्नी व नातेवाईकांचे नावे कंपन्या स्थापन करुन थेट
कामे त्या कंपनीद्वारे करुन खात्यावर पैसे वळते करणे अशा
प्रकारचे उद्योग सुरु आहेत. माहिती अधिकारात पुणे, सातारा
इतर कार्पोरेट व्यवहार मंत्रालय, पुणे कार्यालय, कंपनी कायदा,
मर्यादित दायित्व भागीदारीबाबत मिळालेल्या कागदपत्रावरुन
श्री. निकम याच्याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे
मिळालेल्या माहितीनुसार अमोल निकम यांच्या कार्यकाळात ५
कोटीच्या वर दिलेल्या वर्क ऑर्डर याची चौकशी करुन संबंधीत
निकम यांचे निलंबन करावे.

श्री.निकम यांनी ६ जानेवारी २०२२ रोजी मे. एस. व्ही. जाधव
कॉन्ट्रक्टर प्रा. लि. साठे कॉम्प्लेक्स मिरज यांना, ६ मार्च २०२०
रोजी मे. माधुरी अमोल मोरे, बारामती यांना, ९ मे २०२३ रोजी
मे. एन. एन. के. कन्स्ट्रक्शन इलेक्ट्रोटेक, पुणे यांना, १२ मे
२०२३ रोजी मे. एस. व्ही. जे + आय.एच.पी.+ योगीराज
पॉवरटेक+ पृथ्वीराज देसाई, सांगली यांना, २० जून २०२३
रोजी सचिनकुमार संभाजीराव नलवडे, वाढे सातारा यांना, १५
मार्च २०२४ रोजी सचिनकुमार संभाजीराव नलवडे, २६ मे
२०२३ रोजी मे. महावीर सिव्हील इंजिनिअरींग ॲण्ड सर्व्हसेस
प्रा. लि. + ए.आर. डब्ल्यु इन्फ्रा प्रोजेक्ट, पुणे यांना, २९मे
२०२३ रोजी सोनाई आर.एम. एन. एस. सी.सी. सांगली यांना,
१५ मार्च २०२४ रोजी अमोल निगडे, पुणे यांना, १५ मार्च
२०२४ रोजी सचिनकुमार संभाजीराव नलवडे, वाढे सातारा
यांना, २० जून २०२३ रोजी श्रीगणेश कन्स्ट्रक्शन, गोडोली,
सातारा यांना अशा एकूण ७६३ कोटी ७७ लाख ६७ हजार
३८९ इतक्या रक्कमेच्या निविदा देवून या ठेकेदारांकडून पैसे
पत्नीच्या कंपन्या मधे घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे.

या सर्व कामांची, तुलनात्मक तक्ता, वर्क ऑर्डर, दिलेली सर्व
देयके, झालेले काम एम.बी. रजिस्टर इत्यादी याची सखोल
चौकशी करावी. वर्क ऑर्डर दिल्यानंतर काहीच दिवसात काम
करण्यापुर्वी बिल काढण्यात आले आहे.
या दिलेल्या सर्व वर्क ऑर्डर त्यांची कामे संबंधीत कंपन्या यांचे
लागेबांधे श्री. अमोल निकम आणि त्यांच्या परिवाराशी
निगडीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीबाबत
कोटयावधी रुपयांच्या या दिलेल्या वर्क ऑर्डर आर्थिक तडजोड
करुन केलेल्या असून अधिकाराचा दूरुपयोग करुन टेक्निकल
बीड बसत नसताना, कागदपत्रे अपूर्ण असताना
लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली आणि मोठ्या आर्थिक
तडजोडी करुन या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. एस.व्ही.
जाधव कॉन्ट्रक्टर प्रा. लि. मिरज, आणि मे. एस. व्ही. जे. या
दोन्ही कंपनी एकाच मालकाच्या आहेत. श्री. जाधव शशांक हे
मालक असून त्यांचा मुलगा शुभम शशांक जाधव आणि
अमोल निकम यांच्या सुविद्य पत्नी स्वप्नाली अमोल निकम हे
दोघे विश्वराज बिल्डकॉन एल.एल.पी. या कंपनीचे भागीदार
आहेत. अदित्य साहेबराव भोसले, बावधन ता. वाई जि. सातारा
यांना दहा लाखांच्या आतील कामे अमोल निकम यांनी त्यांच्या
कार्यकाळात दिली आहेत. आदित्य भोसले यांच्याकडे
कोटयावधी रुपयांची कामे आहेत. आदित्य भोसले यांच्या
कंपनीत अमोल निकम यांचे कुटुंबिय भागीदार असल्याचे
कागदपत्रावरुन स्पष्ट झाले आहे.

पीएमबी इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी, भुविकास इन्फ्रास्ट्रक्चर
एलएलपी या कंपनीत स्वप्नाली निकम या भीगादार आहेत.
धाराशिव जिल्हयातील जलसंपदा विभागात कार्यरत असणारे
वरिष्ठ अधिकारी विजय थोरात हे अमोल निकम यांचे घनिष्ठ
मित्र, नातेवाईक आहेत हे कागदपत्रावरुन सिध्द होत आहे.
श्री. निकम, कार्यकारी अभियंता जिहे कठापूर उपसा सिंचन
विभाग या पदावर हजर झाल्यापासून आजअखेर आपले,
आपल्या कुटुंबियांचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यात तत्पर
असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात
दिलेल्या वर्क ऑर्डर, दिलेली बिले, झालेली निकृष्ठ दर्जाची कामे
संबंधीत सर्व कंपन्या आणि वर्क ऑर्डर दिलेले ठेकेदार आणि
कंपन्या यांच्या कामाचे, बिलांचे आर्थिक देवघेवीचे रेकॉर्डची
तसेच मालमत्तेची एसआयटीमार्फत चौकशी होवून संबंधीतांचे
निलंबन करुन संबंधीत कंपन्या, ठेकेदार यांना काळ्या यादीत
टाकावे. शासनाने या अभियंताला कार्यालयात येण्यास बंदी
घालून तात्काळ निलंबित करुन मगच चौकशी करावी. अन्यथा
चौकशी प्रभावित होवू शकते.

शासनाने दिलेल्या अधिकाराचा पुरेपुर दुरुपयोग त्यांनी त्यांचे
कार्यकाळात, त्यांनी मंजूरी दिलेली सर्व कामे, पत्नी सहभाग
असणाऱ्या कंपनीला दिलेल्या बिलांची तसेच त्यांची, त्यांची
पत्नी, मुले व त्यांचे नातेवाईक यांच्या नावे असणाऱ्या खासगी
कंपनी आणि बेहिशोबी मालमत्तेची लागेबांधे, आर्थिक व्यवहार,
बँक खात्याचे व्यवहार, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हितसंबंध, मालमत्ता
याची सखोल चौकशी करावी. या कार्यकाळात त्यांनी ठेकेदार,
नातेवाईक, यांचे सिडीआर, कॉल रेकॉर्ड, व्हॉटसअप रेकॉर्ड
इत्यादीची चौकशी करुन, शासनाची फसवणूक करणाऱ्या श्री.
अमोल निकम या अभियंत्याला ३१ मे पर्यंत थेट निलंबन किंवा
बडतर्फ करावे. अन्यथा योग्य त्या न्यायालयात दाद मागावी
लागेल असा इशाराही श्री.मोरे यांनी यावेळी दिला.

चौकट : तर नेत्यांच्याही लक्षात येईल

सचिन नलावडे नावाचा एक छोटा कॉन्ट्रॅक्टर या घोटाळ्यात
सहभागी आहे. त्याच्या नावावर कोट्यवधी रकमेची टेंडर
आहेत. त्याला कोणत्या तात्या, मामा, भैय्या, भाऊ, काकाचा
आशीर्वाद आहे याचाही शोध गृहखात्याने किंवा देशाच्या ईडीने
घ्यावा. इतका छोटा कॉन्ट्रॅक्टर कमी कालावधीमध्ये इतका
मोठा घोटाळा कसा काय करु शकतो ? याची चौकशी केली की
पडद्यामागचे सगळे सूत्रधार प्रकट होतील आणि नेत्यांच्याही
लक्षात येईल वाटप कितीचे आणि हिशोब कितीचा ?

चौकट : तर लोकप्रतिनिधीही अडचणीत येणार

अमोल निकम या कार्यकारी अभियंत्याचे वैशिष्टय असे की
त्याला आमदार, खासदार, मंत्री यांनी मुदतवाढीसाठी पत्रे दिली
आहेत. हा सगळ्याच लोकप्रतिनिधींचा लाडका आहे, त्यामुळे
त्याच्या कृष्णकृत्यामुळे लोकप्रतिनिधीही अडचणीत येण्याची
शक्यता नाकारता येत नाही. मुदतवाढीचे पत्रे त्यांनी कोणत्या
हेतूने दिली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

चौकट : प्रशासकीय राजवटीची सखोल चौकशी व्हावी

सातारा जिल्हयात सध्या प्रशासकीय राजवट आहे. अनेक
अधिकारी पत्नीच्या, नातेवाईकाच्या नावावर व्यवसाय दाखवून
आणि त्याचा वापर आपले गोरखधंदे लपवण्यासाठी करतात.
काही जण पत्नीला सोबत घेऊन अधिकार गाजवतात. सगळे
अर्थपूर्ण व्यवहार पती, पत्नी, अधिकारी जिल्हयात अनेक
ठिकाणी करत आहेत.

चौकट : तीन कंपन्यात पत्नीची भागीदारी

विश्वराज बिल्डकॉन एल.एल.एल,पी, पुणे, पीएमबी
इन्फ्रास्ट्रक्चर एल.एल.पी.पुणे आणि भूविकास इन्फ्रास्ट्रक्चर
एलएलपी पुणे या तीन कंपन्यांमध्ये श्री.अमोल निकम यांच्या
पत्नी सौ. स्वप्नाली अमोल निकम या भागीदार आहेत. त्यामुळे
आयकर विभाग, ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
यांच्या मार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

You Might Also Like

फलटण शहर पोलीस स्टेशन समोरून दुचाकी चोरीला!

विहिरीत पडलेल्या रान गव्याला मिळाले जीवदान

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला फलटणमध्ये गंभीर मारहाण

फलटण शहर पोलिस ठाण्यात व उपजिल्हा रुग्णालयात आरोपींची बडदास्त

Homeफलटणफलटण शहरात कुंटणखाना जोमात;फलटण शहर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस निरीक्षक कोमात!फलटणफलटण शहरात कुंटणखाना जोमात;फलटण शहर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस निरीक्षक कोमात!

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

*श्रीराम कारखान्यात जायला त्यांना तोंड नाही – श्रीमंत रामराजे

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 2, 2025
अयोध्येतील लष्कराची13000 एकर आरक्षित जमीन अदानी, बाबा रामदेव, रविशंकर यांच्या नावावर आहे
फलटण – येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात उच्च न्यायालयाकडुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश ; फलटणमध्ये भीम आर्मीकडुन जल्लोष
ज्योती मल्होत्राशी ओडिशाच्या यूट्यूबर तरुणीचं कनेक्शन? पाकिस्तानातही गेली होती सोबत! चौकशी सुरू
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account