फलटण – श्रीराम साखर कारखान्यामध्ये ते काही करू शकत नाहीत. त्यांना आधी नगरपालिका घ्यायची आहे. म्हणून या तक्रारी वाढल्या आहेत असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांकडे टोला लगावला.
श्रीराम साखर कारखान्यामध्ये त्यांना जायला तोंड नाही. स्वतःच्याच कारखान्याचे दर दिले नाहीत. स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे त्यांना दिसत नाही. ते फारच उंच असल्यामुळे खाली यायचीच त्यांची तयारी नाही. तसेच ही जी गॅंग जमली आहे त्याचा पार्टीचा काही संबंध नाही अशाप्रकारे श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी विरोधकांकडे निशाणा लावला.



