कोल्हापूर : प्रतिनिधी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार -२०२५ संस्थापक – सचिव – फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी, अध्यक्ष – पुरूष हक्क संरक्षण समिती पुणे,सामाजिक कार्यकर्ते तथा अँड. संतोष शिंदे यांना जाहीर.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार असून मानाचा फेटा,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके आणि राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान होणार असून त्यासाठीं प्रमुख वक्ते प्रा. प्रकाश नाईक, मा अनिल म्हमाणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शोभा चाळके आहेत.
लोकशाहीर,सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांचा आदर्श मानून कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य,राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देवून प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, प्रा.किसनराव कुराडे, डॉ. श्रीपाद देसाई, मा . अनिल म्हमाणे,प्रा. प्रकाश नाईक, डॉ. करूना विमल, मा. किसनराव तरटे, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, अर्हत मिणचेकर, आदित्य म्हमाणे, अमिरत्न मिणचेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. तरी कार्यक्रमाला सर्वांनी कुटुंबासह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार कोल्हापूर -२०२५अँड संतोष शिंदे यांना जाहिर
Leave a comment



