By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन
प्रशासकीय

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन

Prashant Ahiwale
Last updated: June 10, 2025 9:36 pm
Prashant Ahiwale Published June 10, 2025
Share
SHARE

राज्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ( National Mission on Natural Farming – NMNF ) ही महत्वाकांक्षी योजना सन २०२४-२५ पासून राबविण्यात येत आहे . या मिशनची अंमलबजावणी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभाग व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात येत आहे . शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे , बाह्य निविष्ठा खरेदी न करणे , निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणाली विकसित करणे , मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवित करणे , पाण्याची गुणवत्ता वाढवणे , जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित , आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पुरवणे हे मुख्य मिशनचे उद्दिष्ट आहेतयोजनेत केंद्राचा हिस्सा ६० टक्के व राज्याचा हिस्सा ४० टक्के या प्रमाणात निधी मंजूर आहे . योजनेअंतर्गत ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट असे एकूण ५४ गट ( २७०० हेक्टर क्षेत्र ) १० तालुक्यातून निवडण्यात आलेले आहेत.प्रति शेतकरी १ एकर क्षेत्र याप्रमाणे एकूण ६ हजार ७५० शेतकरी निवड करण्याची कार्यवाही सुरू आहे .

प्रती गट २ कृषी सखी ( Community Resource Persons – CRP ) असे एकूण १०८ कृषी सखींची निवड करण्यात आलेली आहे . निवडलेल्या कृषीसखींना कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात एकूण २ केव्हिके- कृषी विज्ञान केंद्र , बोरगांव ता . जि . सातारा व कृषी विज्ञान केंद्र , कालवडे , ता.कराड यांची निवड करणेत आलेली आहे . २८ एप्रिल ते २ मे २०२५ कलावधीत एकूण ४८ कृषी सखींचे ५ दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र , कालवडे , ता . कराड येथे पूर्ण झाले . उर्वरित कृषी सखींचे ५ दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र , बोरगांव , ता . सातारा येथे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नियोजन केले आहे . गावपातळीवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात एकूण ५८ ग्रामपंचायती निवड केली असून प्रत्येक गावामध्ये २ जन जागृती कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत . सहभागी शेतकरी यांना प्रशिक्षण देणे . सहभागी शेतकऱ्यांच्या शेताचे नैसर्गिक शेती प्रमाणीकरण करणे .  हे या योजनेंतर्गत समाविष्ट घटक आहेतनैसर्गिक शेती करणाऱ्या इच्छुक शेतक – यांसाठी अभ्यास साहित्य , फार्म डायरी , FAQ पुस्तिका इ . उपलब्ध करून देण्यात येणार आहे . निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन साठी रक्कम 4 हजार रुपये प्रती एकर प्रती वर्ष याप्रमाणे २ वर्षासाठी अनुदान देय असणार आहे . कृषी सखी ( CRP ) यांना मानधन रक्कम 5 हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे २ वर्षासाठी तरतूद आहे . कृषी सखी ( CRP ) यांना मोबाईल उपकरणांसाठी मदत मिळणार आहे . भारतीय प्राकृतिक जैव – इनपुट संसाधन केंद्राची ( BRC ) स्थापना ( गरजनुसार ) – ३ गटांसाठी २ याप्रमाणे एकूण ५४ गटांमध्ये ३६ BRC स्थापन करणेत येणार आहे . यामध्ये नैसर्गिक शेती करणारे शेतकरी , शेतकरी गट , गोशाला , शेतकरी उत्पादक कंपनी , खाजगी संस्था लाभ घेऊ शकतात . यासाठी रक्कम रु . एक लाख इतके अनुदान देय आहे . कृषि सखींची निवड पूर्ण झाली असून शेतकऱ्यांची सुद्धा ९ ८ टक्के निवड झालेली आहे .  निवड करणेत आलेल्याशेतकऱ्यांचे नैसर्गिक शेती विषयी कृषि विज्ञान केंद्र येथे प्रशिक्षण माहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करणेत आले आहे . सदर योजनेचा कालावधी २ वर्षाचा असून यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण , बांधावर सेंद्रीय निविष्ठा निर्मिती , प्रमाणीकरण , प्रोत्साहनासाठी अनुदान इत्यादी बाबी राबविण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत , 3 रा मजला , हजेरी माळ , सातारा येथे किंवा 02162-226822 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा संकलन : जिल्हा माहिती कार्यालय , सातारा

You Might Also Like

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..

फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ लोकराज्यचा वेव्हज विशेषांक प्रकाशित

ग्रामपंचायत पंचायत कोळकी येथील डस्टबिन वाटपात अपार्टमेंटधारकांना   वगळण्यात आले

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी दादा अहिवळे मंगळवार पेठ , फलटण यांच्या तर्फे १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 15, 2025
भारताला हवे आहेत ‘हे’ ३ आतंकवादी
मा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे ना निंबाळकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण
गहाळ 75 मोबाईलचे शहर पोलिसांकडून तक्रारदारांना वितरण
श्रीमंत राजे गटाचे मा.नगरसेवक किशोरभैय्या निंबाळकर व शंकर मार्केट गणपती महोत्सव समितीच्या वतीने भीम जयंती मिरवणूकीची सडा रांगोळी काडुन स्वागत केल्या बद्दल आभारी आहे.🙏🇪🇺
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account