फलटण :-तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या फलटण तालुक्यातील सर्वच्या सर्व 131 ग्रामपंचायतींची सरपंचपद आरक्षण सोडत सजाई गार्डन येथे प्रांताधिकारी सौ . प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली , तहसिलदार डॉ . अभिजीत जाधव , निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले . लोकसंख्येनिहाय व पूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीच्या आधारे सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली . यामध्ये येणाऱ्या निवडणूका या लोकनियुक्त सरपंच म्हणून संपन्न होणार आहेत . राज्यशासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन 2025 ते 2030 याकालावधीमध्ये निवडणूकांची N LTE 4G 69 % होणाऱ्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपत्र झाली . सर्वसाधारण – सोनगाव , सस्तेवाडी , जावली , गिरवी , झिरपवाडी , पिंपळवाडी , सुरवडी , भाडळी खूः , होळ , आदर्की खूः , वडगाव , कापडगांव , सोनवडी खुर्द , कोळकी , मुरुम , दुधेबावी , बिबी , कांबळेश्वर , पिंप्रद , अलगुडेवाडी , शेरेचवाडी ( हिंगणगाव ) , तिरकवाडी , नांदल , फडतरवाडी , कोरेगांव , वडजल , तावडी , जाधववाडी ( फ ) , घाडगेवाडी , मुळीकवाडी , जाधवनगर , सावंतवाडी , माझेरी , निरगुडी + मांडवखडक , ढवळ , शिंदेवाडी , सोमंथळी , सालपे सर्वसामान्य महिला – सांगवीभिलकटी , खटकेवस्ती , कुलवली खुर्द , सासकल , आळजापूर , कुरवली बु , + दत्तनगर , वडले , चौधरवाडी , विडणी , टाकळवाडे , आंदरूड , खराडेवाडी , कापशी , आरडगांव , रावडी खुर्द , काळज , ताथवडा , तडवळे , मिरढे , चव्हाणवाडी , चांभारवाडी , वाठार – निंबाळकर , जाधववाडी ( आ . ) , सासवड , फरांदवाडी , मिरेवाडी ( कुसुर ) , कोऱ्हाळे , डोंबाळवाडी , घाडगेवाडी , ढवळेवाडी ( निंबळक ) , पिराचीवाडी , मानेवाडी , दऱ्याचीवाडी , गोळेगाव , परहर बु . ॥ , परहर खुर्द , बरड , गोळेवाडी , नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओ.बी.सी. ) – महिला- वाघोशी , भाडळी बु ,सोनवडी बु , आदर्की नाईकबोमवाडी , बु ., तांबवे , टाकुबाईचीवाडी , मलवडी , पाडेगांव , शेरेशिंदेवाडी , बोडकेवाडी , जोर ( वाखरी ) , जोर ( कुरवली ) साठे , ठाकुरकी , मिरगांव , उपळवे , झडकबाईचीवाडी , सर्वसाधारण हिंगणगाव , काशिदवाडी , शेरेचीवाडी ( ठ ) विठ्ठलवाडी , राजाळे , तरडफ , मठाचीवाडी , तरडगांव , रावडी बु .।। , धुमाळवाडी , शिंदेमाळ , शिंदेमाळ , उलूंब , वाखरी , कुसूर , धुळदेव , खडकी , परहर खु , अनुसूचित जमाती ( एस.टी. ) ढवळेवाडी – ( आसू ) . अनुसूचित जाती ( एस.सी. ) – महिलावेळीशी , शिंदेनगर , गुणवरे , खुंटे , राजुरी – भवानीनगर , निंबळक आसू , दालवडी , वाजेगांव , माळेवाडी , मिरेवाडी ‘ सर्वसाधारण – जिंती , पवारवाडी , गोखळी , मुंजवडी , सरडे , निंभोरे , विंचुर्णी , हणमंतवाडी , खामगाव , वरील प्रमाणे सन 2025 ते 2030 अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपत्र झाली आहे



