मुंबई , दि . २ : मुंबईत सुरू असलेल्या ‘ वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘ अर्थात ‘ वेव्हज् २०२५ ‘ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘ लोकराज्य ‘ आणि ‘ महाराष्ट्र अहेड ‘ च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले . जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘ वेव्हज ‘ परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक , मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे , उद्योग विभागाचे 7 सचिव पी . अन्बलगन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी . वेलारासू , सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल , विकास आयुक्त ( उद्योग ) दीपेंद्रसिंह कुशवाह , ‘ लोकराज्य ‘ चे प्रबंध संपादक तथा
संचालक ( माहिती ) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे , संचालक ( वृत्त- जनसंपर्क ) डॉ . गणेश मुळे , उपसंचालक ( वृत्त ) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि ‘ लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या ‘ वेव्हज’शी संबंधित विविध विशेषांकात विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना , सिंहस्थ कुंभमेळा , अन्नसुरक्षा , जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयाचा देखील मागोवा घेण्यात आला आहे



