फलटण प्रतिनिधी : फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय हे फिर्यादी पेक्षा आरोपींची उठाठेव करण्यात मग्न असल्याने तालुक्यात हुकूमशाही वाढली असून कायद्याचा धाक कमी झाला आहे . गरीब नागरिकांना न्यायासाठी प्रचंड झगडावे लागत असून फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने तालुक्यात प्रचंड गुंडागर्दी वाढली आहेयाबाबत सविस्तर माहिती अशी की , फलटण येथे कामावरून घरी परतणाऱ्या तीन कष्टकरी कामगारांना रात्रीच्या वेळी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तिघा जाण्याच्या टोळक्याने क्षुल्लक कारणावरून लाथा बुक्यांनी मलमूत्र विसर्जन होईपर्यंत मारहाण करत दहशत माजवली या घटनेनंतर फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्यानी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याची मागणी केली परंतूनेहमी प्रमाणेच तक्रार दाखल करण्यास टाळा टाळ करणारी पोलीस यंत्रणा वैद्यकीय अहवालासाठी अडून बसली आरोपींची वैद्यकीय तपासणी LTE 53 % करताना सुरवातीला फक्त खुर्चीत बसवून अहवाल देण्यात आला . यावेळी आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले गेले नाहीत सामाजिक कार्यकर्ते व सोबत असणाऱ्या फिर्यादीच्या नातेवाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आरोपींचे कसलेही सॅम्पल न घेता अहवाल दिल्याने गोंधळ करायला सरुवात केली यावेळी यावेळी पोलिस व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपींची खास बडदास्त ठेवली प्रकरण अंगाशी येईल असे वाटत असल्याने आरोपींना पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणून सॅम्पल घेतले . या उलट फिर्यादी यांना प्रचंड मारहाण झाली असताना चक्कर येत असताना फिर्यादीच आरोपी असल्या सारखे व वैद्यकीय आधिकरी पोलीस असल्यासारखे त्यांच्याशी वागत होते आरोपींनापोलिसांनी व्हॅन दिली मात्र फिर्यादी पावसात भिजत दुचाकीवर रुग्णालयात आले त्यानंतर देखील त्यांची अवहेलना थांबली नाही आरोपी पाच ते दहा मिनिटांत वैद्यकीय चाचणी करून पाठवले मात्र फिर्यादीना रात्री अडीच वाजेपर्यंत कोणतेही उपचार न करता बाकड्यावर बसवून ठेवले . वैद्यकीय आधिकारी फिर्यादींना आरोपीची वागणूक देत होते दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या तीन गरीब कामगारांनामारहाण होते रात्री तीन वाजेपर्यंत ते उपाशीच राहतात आरोपी मात्र पोलिस व वैद्यकीय आधिकर्यांच्या विशेष बडदास्त खाली घरी जातात यंत्रणेला लागलेली कीड कधी नीट होऊल असे वाटत नाही परंतू कायद्याचे पालन अधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी करावे पण तसे होताना दिसत नाही . याबाबत फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय यांची चौकशीची मागणी करण्यात येत आहे
फलटण शहर पोलिस ठाण्यात व उपजिल्हा रुग्णालयात आरोपींची बडदास्त
You Might Also Like
Leave a comment
Popular News
- Advertisement -




