फलटण ;-पवार कुटुंबात निर्माण झालेला राजकीय दुभंग मिटवण्यासाठी सुप्रिया सुळेच मध्यस्थी करू शकतात , असा सूचक सूर आमदार रोहित पवार यांनी लावला . अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
भारतीय संस्कृती कुटुंबाच्या एकजुटीवर भर देते . पवार कुटुंब एकच आहे आणि त्यांच्यातील काही मतभेद असले तरी ते एकत्र येऊ शकतात . यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा . सुप्रिया सुळे यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात , असे मत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले . गुरुवारी ( दि . २४ एप्रिल २०२५ ) जिल्हाधिकारी डॉ . पंकज आशिया यांच्याशी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले
पवार कुटुंब एकत्र येणार ? पवार कुटुंब भविष्यात एकत्र येण्याची शक्यता आहे का , या प्रश्नावर रोहित पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला . त्यांनी सांगितले की , पवार कुटुंबात काह मतभेद असले तरी ते एकच आहे . त्यांनी व्यक्तिगत इच्छा व्यक्त करताना म्हटले की , पवार कुटुंबाने अधिक ताकदीने एकत्र यावे . राजकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि दुसऱ्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी एकत्र येण्याचा निर्णय स्वतः घ्यायला हवा . यामध्ये सुप्रिया सुळे मध्यस्थी करू शकतात , असे
त्यांनी सुचवले . मात्र , याबाबत अंतिम निर्णय काय होईल , यावर सध्या भाष्य करणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले .
राम शिंदेंवर टीका रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर कर्जत – जामखेड मतदारसंघातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला . त्यांनी म्हटले की < सध्याच्या सरकारच्या काळात दबावतंत्राचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत . कर्जतमध्येही असेच राजकीय ताब्याचे राजकारण खेळले जात आहे . त्यांनी लोकशाहीच्या मूल्यांना या सरकारने कमी लेखल्याचा दावा केला . पवार यांनी पुढे सांगितले की , कर्जत – जामखेडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि मतदारसंघासाठीचा निधी सरकारकडे
अडकला आहे . याबाबत राम शिंदे कोणतेही ठोस प्रयत्न करत नसल्याची टीका त्यांनी केली . राजकीय दबाव रोहित पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की , सत्ताधारी पक्ष पदाचा गैरवापर करून राजकीय ताकद वाढवण्यासाठी आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे . यामुळे लोकहिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे . कर्जत – जामखेडमधील पाण्यासारख्या मूलभूत समस्यांवर सरकार आणि स्थानिक
नेते लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला



