फलटण: फलटण शहर हे पुणे येथील रेड लाइट एरिया असलेल्या बुधवार पेठे सारखे होऊ लागले आहे.फलटण शहरातील मुख्य चौकात तसेच काही अपार्टमेंट मध्ये तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक लॉज वर अनाधिकृत पणे कुंटणखाना जोमात सुरू आहे.
फलटण शहर आणि तालुक्यातील परिसरातील काही लॉजवर देहव्यापाराचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत अशी सुत्रांची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण ग्रामीण पोलीसांनी फलटण तालुक्यातील सांगवी-माळेवाडी या ठिकाणी असल्यालेल्या हॉटेल राजमुद्रा या कुंटनखाण्यावर कारवाई केली होती.परंतू त्या नंतर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फलटण-सातारा रोड वर एका लॉजवर अवैध कुंटनखाणा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळत आहे.
अनैतिक प्रकार सुरु असून पोलीसांकडून कारवाईत सातत्य राखण्याचे एक आव्हान निर्माण झाले आहे. लॉजवर असे लॉजवर अवैध कुंटनखाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, मिरज आणि कोल्हापूरातून तरुणी व महिला (यातील काही तरुणी तर अल्पवयीनच आहेत) आणून याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवला जात आहे.
फलटण शहर आणि तालुक्यात मुली-तरुणी आणून त्यांना हॉटेल, लॉज किंवा उच्चभ्रू वसाहतीतील रूममध्ये ठेऊन त्यांचे फोटो एजंट लोकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येत असून डील फायनल झाल्यास ग्राहकाला संबंधित लॉज किंवा रुमवर पाठवून वेश्याव्यवसाय केला जातो. फलटण शहरात असा व्यवसाय करणारे जाळे सक्रिय असून, दर दोन दिवसाला बाहेरील जिल्ह्यातून वेगवेगळ्या तरुणी आणून त्यांच्यामार्फत हा वेश्याव्यवसाय चालवला जात आहे.
वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांनी आपले बस्तान चक्क शहर आणि तालुक्यातील अनेक लॉजवर बसवले आहे. पुणे, मुंबई, नाशिक,आणि कोल्हापूरहुन तरुणी व महिला आणून त्यांना देहविक्रीसाठी हॉटेल, लॉज, आणि बंगल्यांमध्ये पुरविण्यात येत आहे. फलटण शहरासह तालुक्यात चाललेल्या या वेश्याव्यवसायाचा ठावठिकाणा पोलीसांनादेखील माहिती असून लक्ष्मी कृपा होत असल्याने संबंधित ठिकाणी पेट्रोलिंग केले जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. संबंधित व्यवसाय चालवणाऱ्यांना परिसरातील सामान्य नागरिकांनी हटकले असता पदरी असलेल्या गुंडांकडून तसेच विनयभंगाची भीती दाखवून त्यांच्यावरच अरेरावीची भाषा करून आमचे पोलीसांशी चांगले संबंध असून कायद्यात अडकवण्याची भाषा हे महाभाग करीत आहेत.
फलटण शहर पोलीसांशीच चांगले संबंध असल्याची बतावणी केल्यामुळे सामान्यांचीही कोंडी होत आहे. हे व्यावसायिक देखील चांगलेच तरबेज असून त्यांनी कुंटणखान्याची व्याख्या बदलली असल्याचे समोर येत आहे. बाहेरून मुली आणून ग्राहकांना मोबाईलवर फोटो पाठवून व स्टेटस ला फोटो ठेवून डील फायनल झाल्यास त्यांना लॉजेसवर वा इतरही काही ठिकाणी पाठविण्यात संबंधित लोक आघाडीवर असून तरुणी आणि महिलांना देह व्यापार करण्यास भाग पडून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत.
तसेच अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी त्यांचे एजंट देखील फलटण शहरासह तालुक्यात सक्रिय झाले आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख साताऱ्यात रुजू झाल्यापासून मात्र, अवैध धंदेवाल्यांचा बिमोड करण्याच्या सुचना त्यांनी पोलीस ठाण्यांच्या कारभाऱ्यांना दिल्या आहेत. काही समाधानकारक कारवा-या होत असताना दिसून देखील येत आहेत. मात्र, फलटण शहरातील काही एजंट हे महिला आणि तरुणींना प्रलोभने वा काही वेळेस दमदाटी करुन देहव्यापार करायला लावून स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेत आहेत.
असे प्रकार करणाऱ्या नराधमांना ठेचण्याचे मोठे आव्हान फलटण शहर व ग्रामीण पोलीसांपुढे असणार आहे. या आव्हानाचा सामना करीत असताना त्यांनी कोणतीही भीडभाड न बाळगता अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी फलटण शहरासह तालुक्यातील शांतताप्रीय नागरिक करीत आहेत.



