फलटण (प्रतिनिधी) राशीन ( जि . अहमदनगर ) येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकातील महात्मा फुले नामफलकाची करीत तोडफोड व विटंबना जातीवाचक शिवीगाळ काही स्थानिक समाजकंटकांनी केली . या घटनेचे तीव्र पडसाद फलटण येथे पाहायला मिळाले . या घटनेविरुद्ध फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी फलटण यांना निवेदन दिले . यावेळी ओबीसी बांधवांनी निदर्शने केली . राशीन येथील घटनेबरोबरच वीर , ता . पुरंदर येथील ओबीसी युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यात आला . राशीन येथील फुलेंच्या नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवरत्वरित कायदेशीर कारवाई झाली पाहिजे . फुले , शाहू , आंबेडकर यांच्या विचारांना दडपण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतील , असे निवेदनात फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने नमूद केले आहे . यावेळी बापूराव शिंदे , नंदकुमार नाळे , गोविंद भुजबळ , मुनिष जाधव , पिंटू इवरे , आमिर शेख , दत्ता नाळे , विकास नाळे , संदीप नेवसे , रणजित नाळे , अमोल रासकर , अमोल शिंदे , ऋषिकेश काशीद , डॉ . रणजित बनकर , बापूराव बनकर , बाळासाहेब ननावरे , ऋषिकेश शिंदे , बंडू शिंदे , शनेश शिंदे , रोहन शिंदे , प्रवीण फरांदे , विजय शिंदे , दीपक शिंदे , किरण राऊत , बाळासाहेब घनवट , दिनेश शिंदे , अभिजित शिंदे किरण जाधव यांची उपस्थिती होती



