आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्यास फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराचे वितरण सोहळा नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी,वसंत शिंदे ज्येष्ठ साहित्यिक व प्रोप्रायटर शिंदे फर्निचर आणि अमेय भागवत, न्यूट्रिशन आणि डायटीशियन यांच्या उपस्थितीत पार पडला.
सामाजिक (विविध) क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ महिलांचा सत्कार करत असताना त्यांच्या कार्याचा गुणगौरव येथे करण्यात आला.
या पुरस्कारासाठी अॅड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात (फलटण) यांच्यासह डॉ. शुभांगी गायकवाड (सातारा), श्रीमती शैला वसंत यादव (औंध), सौ. कुमुदिनी जगदीश पांढरे (सासवड), सौ. विमल चिंतामणराव मुंडे (रायगड), डॉ. नीलम दिलीप शिंदे (सांगली), सौ. हेमलता किसन फडतरे (खटाव), अॅड. सुचित्रा काटकर (सातारा).
श्री नितीन तारळकर व श्री वसंत शिंदे यांनी आपल्या सद्भावना सर्व महिलांना दिल्या व ध्यास फाउंडेशन यांच्या कार्याचा गौरव केला. नितीन तारळकर यांनी खेळाचे महत्व व स्त्री विकास याचे महत्त्व विशद केले तर श्री वसंत शिंदे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगत महिला कालची व आजची यावरती दोन कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदन करुन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय ध्यास फाउंडेशनच्या संस्था अध्यक्ष डॉक्टर वैजयंती ओतारी यांनी केले सत्कारमूर्तींचा परिचय डॉक्टर सरिता नाईक , सौ.सुप्रिया जाधव व सौ.धनश्री जगताप यांनी केले. ॲड. सुरेश रुपनवर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पदमा ओतारी यांनी केले. प्रमिला जाधव या अंधभगिनीने सर्व मान्यवरांना व पुरस्कार विजेत्या भगिनींना खत निर्मितीची बास्केट दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



