💐 १३५ व्या भीमजयंती दिनी १३५ आदर्श पालकांना पुरस्कार देण्यात येणार.
🔹डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जयंती दिनी आदरांजली, अभिवादन करायचे असेल तर शिक्षण आंणि बुद्ध-भीमाचे संस्कार सर्वांमध्ये रूजले पाहिजेत.
🔹 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती फंडामार्फत – भीमजयंती कँलेंडर प्रकाशित करण्यात येते. तर आता फंडामार्फत ” वर्षभर शिक्षण – संस्काराची भीमजयंती राबविण्यात येत आहे.
🔹यामध्ये सहभागी होणाऱ्या फलटण तालुक्यातील १३५ बांधवांना ” डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
☝️हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आई वडीलांनी खालील पंचसुत्री चे पालन करणे आवश्यक आहे.
🔹आदर्श समाज निर्माण करण्यासाठी पालकांनी दर रविवारी मुलांना घेऊन बुद्ध विहारात गेले पाहिजे
🔹पालकांनी जून महिन्या पासून रोज मुलांना शाळेत पाठवावे. ( मुलांची शाळेत १००% हजेरी पाहिजे )
🔹आई/वडिलांनी रोज सकाळ संध्याकाळी १/२ तास आपल्या मुलांना घरात अभ्यासाला बसवणे आवश्यक आहे.
🔹अभ्यासाच्या काळात घरातील टी.व्ही, मोबाईल बंद ठेवणे गरजेचे आहे.
🔹अभ्यासाआधी ५ मिनिटे ध्यान साधना व बुद्धवंदना व २२प्रतिज्ञा म्हणावी.
☝️जे पालक आपल्या मुलांसाठी असा वेळ वर्षभर देतील असे सर्व पालक आदर्श आहेत. हे सर्व बांधव ” डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श पालक पुरस्कारास पात्र आहे.
🔹पुरस्कार स्वरूप : १३५ आदर्श पालकांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येणार तसेच प्रत्येकी १ हजार रुपये रक्कम शैक्षणिक साहित्या साठी देण्यात येणार आहे.



