- बिहार सरकारने १९४९ साली बुद्धगया टेंपल ॲक्ट १९४९ पास करून बुद्धगया येथील बुद्धमंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी चार बौद्धांची आणि चार हिंदूंची कमिटी स्थापन केल्याचा उल्लेख मागे आलाच आहे.
- बिहार सरकारने जगदिश काश्यपांच्या सांगण्यावरून १९५१ साली नवनालंदा महाविहाराची स्थापना केली.
- नवनालंदा महाविहाराने जगदीप काश्यपांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण त्रिपिटक आणि त्रिपिटकावरील अट्ठकथा देवनागरीत छापून ते ग्रंथ अत्यंत अल्प दरात इच्छुकांसाठी उपलब्ध केले.
- जगदीश काश्यपांच्याच पुढाकाराने भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे २५०० वे वर्ष भव्य प्रमाणात साजरे केले गेले.
- त्याची एक परिणीती म्हणजे ‘२५०० इयर्स ऑफ बुद्धिझम’ या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण ग्रंथाची निर्मिती होय.
- जगदीश काश्यपांनी संपूर्ण संयुक्त निकायाचे हिंदी भाषांतर केले,तसेच त्यांनी बुद्धधम्मावरील इतरही ग्रंथ लिहिले.
- पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढाकाराने निरनिराळ्या बौद्ध देशांनी आपआपले भव्य विहार बुद्धगया येथे निर्माण केले आहेत.
- आता बुद्धगया येथे भारताबाहेरील बौद्ध देशांचे जवळ जवळ ४० बुद्धविहार आहेत.
- त्याचप्रमाणे तेथे सिक्कीम, हिमाचल प्रदेश इत्यादी बौद्ध प्रदेशांचे भव्य विहार आहेत.
- राजगृहात परदेशी बौद्ध देशांचे सहा ते सात विहार तर नालंदा येथे तीन ते चार बौद्ध विहार आहेत.
- वैशाली व पाटणा येथेही बौद्ध विहार निर्माण केले झाले आहेत.
•फुजी गुरुजींनी राजगृहात रत्नागिरी पर्वतावर बांधलेला शांती स्तूप आणि तेथे जाण्यासाठी असलेला रोपवे पर्यटकांचे मोठे आकर्षण झाले आहे.
🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शां.मोरे,पान नं. १८५.)🔹
🔹 संकलन-आयु.प्रशांत चव्हाण सर.🔹
बिहार मधील संघ्यस्थिती
Leave a comment



