फलटण तालुक्यातील साखरवाडी व खामगाव गावामध्ये दिवस रात्र खुलेआम हातभट्टी ताडी व हातभट्टी दारू व जुगार मटका इत्यादी अवैध धंदे जोमात या अवैध धंद्यामुळे
सदर परिसरातील नागरिक व महिलांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या अवैध धंद्यामुळे लहान मुले व युवा वर्ग याकडे पूर्णपणे ओढला जावून भावी पिढी पूर्णत बरबाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे या बेकायदेशीर धंद्यामुळे परिसरामध्ये रोज गुंडागिरी व दादागिरी अशी कृत्य सुरू असून त्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे पण बदमानीच्या भीतीने याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस कुणीही करत नाही तसेच या गंभीर बाबीकडे संबंधीत हद्दीतील पोलीस यंत्रणा पाठ फिरवीत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे सदर कृत्यांना पाठबळ देणाऱ्या स्थानिक समाज कंठकाच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करायची व याद्वारे पोलिसांना हाताशी धरून अवैध धंदे जोमात सुरू आहेत सदर हद्दीतील बेकायदेशीरपणे राजरोज सुरू असलेले अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भूतकाळात झालेली जीवितहानी व त्यामुळे निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्था याची परिस्थिती तसेच भविष्य कालीन होणारी जिवित हानी तसेच त्याचे होणारे दृष्परिणाम टाळले जाऊ शकतील अन्यथा कांही दुर्घटना घडल्यास स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासाकिय यंत्रणा याची जबाबदारी घेणार का ? ते स्वतःची जबाबदारी का पार पाडत नाहीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या गैरकृत्याकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष का करीत आहेत ? आहारी गेलेल्या युवा वर्गाला या व्यसनापासून दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणते प्रयत्न करणार बेकायदेशीर अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांवर कोणाचे अभय आहे राजकीय हस्तक्षेप होत आहे का ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहेत त्यामुळे अवैध धंदे जोमात मात्र पोलीस प्रशासन कोमात ! अशी चर्चा परिसरात सुरू आहे त्यामुळे परिसरातील नागरिक व महिलांना नाहक त्रासापासून दिलासा मिळावा त्याचबरोबर संबंधीत हद्दीतील पोलीस यंत्रणेला जाग आणून या गंभीर बाबीकडे लक्ष घालण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून साखरवाडी व खामगाव परिसरातील गुंडागिरी व दादागिरला आळा बसेल व पोलीस खात्याचा वचक निर्माण होईल या गंभीर समस्येकडे स्थानिक व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास या अनुसंगाने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे साखरवाडी व खामगाव परिसरातील नागरिक बोलत आहेत



