कोळकी येथे श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
कोळकी ता . फलटण या ठिकाणी सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत फलटण तालुका भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने बुद्ध , फुले , शाहू , आंबेडकर , सामाजिक सभागृह येथे नुकतेच श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भंते सुमेध बोधी , व पूज्य भंते धम्मानंद बोधी यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे . पूज्य F या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना बुद्ध धम्माच्या आचरण पद्धतीची शिकवण व गौतम बुध्द , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संपूर्ण माहिती व सर्व आदर्शांच्या जीवन चरित्राचे अभ्यासाचे चिंतन केले जाणार आहे .
सदर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी केंद्र शिक्षक व समता सैन्य दलाचे केंद्राचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु . दादासाहेब भोसले , सातारा जिल्हा अध्यक्ष आयु नानासाहेब मोहिते , तालुका अध्यक्ष महावीर भालेराव , सरचिटणीस बाबासाहेब जगताप , कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर , तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते , तालुका संस्कार विभाग सचिव बजरंग गायकवाड , धम्म सेवक संजय घोरपडे , संपूर्ण तालुका कार्यकारणी यांची उपस्थिती होती . शिबिराचा समारोप गुरुवार दिनांक 15 मे 2025 रोजी होणार आहे .



