फलटण – पार्ले येथील जैन समाजाचे मंदिर महानगर पालीकेने पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज फलटण च्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . आदिनाथ मंदिर येथून निघालेल्या मोर्चात हजारो जैन बांधव , महिला व मुले सामील झाले होते . मोर्चामध्ये विविध मागण्यांचे फलक घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला . आदिनाथ मंदिर येथून निघालेला मोर्चा शंकर मार्केट , मंगळवार पेठ , छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक , भगवान महावीर कीर्ती स्तंभ , गजानन चौक , महात्मा ज्योतिबा फुले चौक मार्गे अधिकार गृह येथे पोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले . यावेळी जे सकल जैन समाजाच्या वतीने नायब
तहसीलदार अभिजीत जाधव यांनां निवेदन दिले यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री . सचिन पाटील , ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता , जयकुमार शिंदे , अमोल सस्ते , अनुप शहा , डाँ . जे . टी . पोळ होते .



