फलटण प्रतिनिधी फलटण नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून , भाजपच्या गोटात उमेदवारीच्या चर्चेला वेग आला आहे . पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी सौ . अनिता प्रशांत काकडे यांना नगरपालिकेची प्रभाग दोन मधून उमेदवारी द्यावी , अशी ठाम मागणी पुढे केली आहे . या मागणीमुळे फलटण भाजपच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे . सौ . अनिता प्रशांत काकडे या सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुदर्शन काकडे यांच्या पत्नी आहेत . प्रशांत काकडे पक्षाशी निष्ठेने कार्यरतआहेत .समाजकारण महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या या कार्यकर्त्या म्हणून सौ . अनिता काकडे यांची ओळख आहे . त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांत तसेच निवडणुकीतील प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला आहे . त्यामुळे ” तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळावी ” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आहे . भाजपच्या आतल्या गोटात मात्र उमेदवारीच्या चर्चेला वेगळाच रंग चढला आहे . काही वरिष्ठ नेते आपापल्या गटातील नावे पुढे करत असल्याचेही समजते . अशा पार्श्वभूमीवर काकडे यांच्या नावाने स्थानिक पातळीवर सकारात्मकप्रतिसाद मिळत सूत्रांकडून कळते असल्याचे सौ . अनिता काकडे यांनी ” पक्षाने विश्वास दाखवला तर नागरिकांच्या समस्यांवर काम करण्यास मी सदैव तत्पर आहे , ” अशी प्रतिक्रिया दिली आहे . दरम्यान , महिला आघाडीसह तरुण कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्या नावाला जोरदार पाठिंबा मिळत आहे . राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरु आहे की , भाजपने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची धोरणात्मक भूमिका घेतली , तर अनिता प्रशांत काकडे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता अधिक आहे .



