गोखळी , ता . फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार श्री . राजेंद्र भागवत यांचे आज एका भीषण अपघातात निधन झाले . गोखळी येथून बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला . त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने गोखळी गावासह फलटण तालुक्याच्या संपूर्ण पूर्व भागावर शोककळा पसरली आहे राजेंद्र भागवत हे शहरात गायत आणि मनामनांत गस्त घालणारे पत्रकारितेतील एक परिचित नाव होते . त्यांचा गोखळी आणि परिसरातील गावांमध्ये दांडगा जनसंपर्क होता . मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत . विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांचा गाढा अभ्यास होता . त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे .त्यांचा पश्चात मुले , सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या गावी गोखळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . त्यांच्या निधनाने तालुक्याच्या पूर्व भागातील एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपले आहे , अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे



